बीड : बीड जिल्ह्यात एकाच दिवसात दिवशी ३ अल्पवयीन मुलींचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मागील दोन दिवसात यातील दोन मुली या दहावीची परीक्षा देत होत्या. या दोन्ही मुलींनी आत्महत्या ( committed suicide ) करून आपले आयुष्य संपविले आहे. तर एका विद्यार्थिनीने छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला तर आणखी एका मुलीचा मृतदेह गूढ अवस्थेत आढळून आला असून त्या मृत्यूचे कारण समोर आलेले नाही. दोन दिवसात ३ मुलीनी केलेल्या आत्महत्येमुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.
अधिक वाचा : Lucky Plants : 'चांगले दिवस' येण्यासाठी घरात लावा ही चार झाड
बीड शहरातील छत्रपती कॉलनीत येथे राहणाऱ्या एका १६ वर्षीय विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सृष्टी रोहिदास काळे असं या मृत विद्यार्थीनीचं नाव होत. सृष्टी रोहिदास काळे ही विद्यार्थीनी दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होती. मात्र, तिने पंख्याला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली आहे. मुलीला पंख्याला लटकलेल्या अवस्थेत पाहून कुटुंबियांनी आक्रोश केला. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. सृष्टी काळे ही सध्या दहावीची परीक्षा देत होती. तिचे आणखी तीन पेपर शिल्लक होते.
अधिक वाचा : कार घेण्याची Desire पूर्ण करण्यासाठी किती लागेल डाउनपेमेंट
दरम्यान, सृष्टी काळे हीने आत्महत्या केली आहे की तिचा कोणी घातपात केला आहे याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. कारण कुटुंबियांशी केलेल्या प्राथमिक चौकशीतून तिने आत्महत्या करण्यासारखे काही कारण नव्हते, अशी माहिती समोर आली आहे. सृष्टी काळेचा मृतदेह खाली उतरवण्यात आला असून, शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
अधिक वाचा : सरकारनं केली कमी केंद्रीय कर्मचाऱ्यांची महागाई,डीए वाढला
भाग्यश्री भोईटेने देखील दहावीची परीक्षा देत होती आणि काही दिवसांपासून मनेष जायगुडे हा तरुण तिची छेड काढत होता. या छेडछाडीला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे भाग्यश्रीच्या नातेवाईकांनी पोलिसात सांगितले आहे. भाग्यश्री बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील दिमाखवाडी येथे राहत होती. दहावीची परीक्षा देणारी भाग्यश्री भोईटे (वय १७ ) या विद्यार्थिनीने छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केली असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.
मयुरी नवनाथ चव्हाण या १४ वर्षीय मुलीचा मृतदेह तिच्या घरासमोरच्या बाजेवर मृतावस्थेत आढळून आला. त्यामुळे नेमका मयुरीने आत्महत्या केली का? तिचा कोणी घातपात केला आहे असा संशय व्यक्त केला जाऊ लागला आहे. मयुरी चव्हाण ही गेवराई तालक्यातील रेवकी येथील रहिवासी असून, ती घरासमोर झोपली असताना सकाळी तिचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे मयुरीच्या मृत्यू संदर्भात संशय व्यक्त केला जात असून मृत्यूचे कारण अद्यापसमोर आलेले नाही.