सर्व मैत्रिणींनी चांगलं राहावं, मला आता सगळं जड जातंय,अलविदा अशी चिठ्ठी लिहित तरुणीने केली आत्महत्या

20-year-old Aarti hanged herself in her hostel : आरतीने ज्या खोलीत आत्महत्या केली आहे. ती खोलीची पोलिसांनी  पाहणी केली असता एका रजिस्टरमध्ये आरतीने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती. या चिठ्ठीत आरतीने  ‘मला खूप मोठे व्हायचंय, पण मला वाटत नाही पुढची ३ वर्षे माझ्याकडून पूर्ण होतील. जीवन हे सुंदर आहे, ते जगले पाहिजे. पण मला आता कंटाळा आला जगण्याचा. सर्व मैत्रिणींनी चांगलं राहावं, मला आता सगळं जड जातंय, अलविदा, असं म्हणत आरतीने आपली जीवनयात्रा संपवली आहे.

20-year-old Aarti hanged herself in her hostel
२० वर्षांच्या आरतीने वसतीगृहात घेतला गळफास, चिठ्ठीत लिहिलं..  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • देवगिरी महाविद्यालयाच्या वसतीगृहात राहणाऱ्या एका २० वर्षीय तरुणीने आत्महत्या केली
  • आरती सर्जेराव कोल्हे असं आत्महत्या करणाऱ्या तरुणीचं नाव आहे.
  • सर्व मैत्रिणींनी चांगलं राहावं, मला आता सगळं जड जातंय, अलविदा असं लिहित केली आत्महत्या

औरंगाबाद : औरंगाबाद येथील देवगिरी महाविद्यालयाच्या वसतीगृहात राहणाऱ्या एका २० वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरती सर्जेराव कोल्हे असं आत्महत्या करणाऱ्या तरुणीचं नाव आहे. आरती कोल्हेने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी देखील लिहून ठेवली आहे. या चिठ्ठीत आरतीने 'जीवन हे सुंदर आहे, ते जगले पाहिजे. पण मला आता कंटाळा आला जगण्याचा' असं लिहून आत्महत्या केली आहे.  आरती कोल्हेने देवगिरी महाविद्यालयामध्ये बीकॉम प्रथम वर्षाला प्रवेश घेतला होता. ती अभ्यासात खूप हुशार देखील होती. अशी माहिती तिच्या मैत्रिणीनी दिली आहे. आरती ही जालना जिल्ह्यातील घनसांवगी तालुक्यातील गुरुपिंप्री गावात राहणारी होती. शेतकरी कुटुंबातील आरती ही पुढील शिक्षणासाठी औरंगाबादला आली होती. अशी माहिती मिळाली आहे.

अधिक वाचा ; आशिया कपमध्ये हा संघ धोकादायक, भारताला सांभाळून राहावे लागेल

मैत्रिणींनी जेव्हा वसतीगृहाच्या खोलीवर येऊन पाहणी केली तेव्हा ती दार उघडत नव्हती

मिळालेल्या माहितीनुसार, आरतीने गुरुवारी कॉलेज पूर्ण केलं आणि ती तिच्या खोलीवर आली.  दुसऱ्या दिवशी तिच्या मैत्रिणी दुपारी क्लासला निघाल्या होत्या. त्यांनी आरतील सोबत घेऊन जाण्यासाठी आवाज दिला. मैत्रिणी आवाज देत असल्याने आरतीने सर्व मैत्रीणीना तुम्ही पुढे चला मीपाठीमागून येते असं सांगितले. पण संध्याकाळ झाली आरती क्लासला गेलीच नाही. क्लास वरून आरतीच्या मैत्रिणी घरी जात असताना त्यांनी  वसतीगृहाच्या खोलीवर येऊन पाहणी केली आणि आरतीला आवाज दिला मात्र आरती काही प्रतिसाद देत नव्हती. आरती दरवाजा देखील उघडत नव्हती. हे पाहून  मैत्रिणींनी त्याची माहिती तातडीने वसतीगृहातील कर्मचाऱ्यांना दिली. कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन खोलीचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता आरतीने शालीने गळफास घेतल्याचे दिसून आले. आरतीला फासावरून खाली उतरवले आणि तातडीने शासकीय रुग्णालय घाटीमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेची माहिती तातडीने वेदांतनगर पोलीस स्टेशनला देण्यात आली.

अधिक वाचा : महाराष्ट्राचे पुत्र उदय लळीत आज सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार 

सर्व मैत्रिणींनी चांगलं राहावं, मला आता सगळं जड जातंय, अलविदा

आरतीने ज्या खोलीत आत्महत्या केली आहे. ती खोलीची पोलिसांनी  पाहणी केली असता एका रजिस्टरमध्ये आरतीने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती. या चिठ्ठीत आरतीने  ‘मला खूप मोठे व्हायचंय, पण मला वाटत नाही पुढची ३ वर्षे माझ्याकडून पूर्ण होतील. जीवन हे सुंदर आहे, ते जगले पाहिजे. पण मला आता कंटाळा आला जगण्याचा. सर्व मैत्रिणींनी चांगलं राहावं, मला आता सगळं जड जातंय, अलविदा, असं म्हणत आरतीने आपली जीवनयात्रा संपवली आहे. आरतीच्या अशा अचानक जाण्याने कुटुंबातील सदस्यांना मोठा धक्का बसला आहे.

अधिक वाचा ; Neeraj Chopraचे दमदार कमबॅक, पहिल्याच थ्रोमध्ये रचला इतिहास

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी