रेल्वेखाली चिरडून २२ मेढ्यांचा मृत्यू, 'असा' घडला अपघात

22 sheep died after being crushed under the train, an incident in Nanded district : सदर घटनेनंतर १२ मेंढ्या या जिवंत होत्या. मात्र त्यांना देखील गंभीर मार लागला होता.  जखमी मेंढ्यांना गावकऱ्यांच्या मदतीने उपचारासाठी जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल करण्यात आलं. मात्र उपचार सुरू असताना १२ मेढ्यांचा मृत्यू झाला. म्हणजे घटनास्थळी १० आणि उपचार सुरु असताना १२ अशा एकूण २२ मेंढ्याचा मृत्यू झाला.

22 sheep died after being crushed under the train, an incident in Nanded district
रेल्वेखाली चिरडून २२ मेढ्यांचा मृत्यू, 'असा' घडला अपघात   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अदिलाबाद - मुंबई नंदीग्राम एक्सप्रेसखाली (accident) चिरडून तब्बल २२ मेंढ्यांचा मृत्यू
  • रेल्वे चालकाला मेंढ्या रेल्वे रूळावर दिसल्या आणि त्याने इमर्जन्सी ब्रेक मारला होता
  • घटनास्थळी १० तर १२ मेढ्यांचा उपचार सुरु असताना पशुवैद्यकीय दवाखान्यात मृत्यू झाला

नांदेड :  नांदेड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. अदिलाबाद - मुंबई नंदीग्राम एक्सप्रेसखाली (accident) चिरडून तब्बल २२ मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. एकाचवेळी २२ मेढ्यांचा मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच ज्या मेंडपाळाच्या मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. त्याला मोठा आर्थिक नुकसान झाले आहे. मेंढपाळ हा मेंढ्यांना घेऊन रेल्वे रुळ पार करत होता. त्यावेळी अचानकपणे रेल्वे आली आणि २२ मेंढ्याना चिरडून निघून गेली.  ही दुर्देवी घटना सोमवारी सायंकाळी नांदेड (nanded) जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील सिरमट्टी गावाजवळ घडली. (22 sheep died after being crushed under the train, an incident in Nanded district)

अधिक वाचा : जुनी कार विकून चांगली रक्कम मिळवायची आहे? मग फक्त हे काम करा

रेल्वे चालकाला मेंढ्या रेल्वे रूळावर दिसल्या आणि त्याने इमर्जन्सी ब्रेक मारला होता

मिळालेल्या माहितीनुसार, किनवट तालुक्यातील सिरमपट्टी गावाजवळ एक मेंढपाळ हा मेंढ्यांना घेऊन रेल्वे रुळ पार करत होता. यावेळी तेलंगाणातील आदिलाबाद येथून भरधाव वेगात नंदीग्राम एक्सप्रेस आली.  मात्र, लक्ष न दिल्याने त्याला समोरून येणारी रेल्वे दिसली नाही. मात्र, रेल्वे चालकाला रेल्वे रूळावर मेंढ्या दिसल्यानंतर त्याने इमर्जन्सी ब्रेक मारला. मात्र रेल्वेची गती जास्त असल्याने मेंढ्या रेल्वे खाली आल्या. या घटनेत १० मेंढ्याचा जागेवरच मृत्यू झाला. 

अधिक वाचा ; एका क्षणाची चूक अन् अवघ्या 5 सेकंदात अनेकांनी गमावला जीव 

१२ मेढ्यांचा उपचार सुरु असताना पशुवैद्यकीय दवाखान्यात मृत्यू झाला

दरम्यान,  सदर घटनेनंतर १२ मेंढ्या या जिवंत होत्या. मात्र त्यांना देखील गंभीर मार लागला होता.  जखमी मेंढ्यांना गावकऱ्यांच्या मदतीने उपचारासाठी जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल करण्यात आलं. मात्र उपचार सुरू असताना १२ मेढ्यांचा मृत्यू झाला. म्हणजे घटनास्थळी १० आणि उपचार सुरु असताना १२ अशा एकूण २२ मेंढ्याचा मृत्यू झाला. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली असून मेढपाळावर आर्थिक संकट ओढवलं आहे. या घटनेची रेल्वे पोलिसात नोंद करण्यात आली. मात्र, सदर घटनेने मेंढपाळला मोठा आर्थिक फटका बसला आहे.

अधिक वाचा : 100 टक्के योग्य कामगिरी होत नसल्यानं Ben Stokesची निवृत्ती

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी