मराठवाड्यात ३ महिन्यांत २३३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

233 farmers commit suicide in Marathwada in 3 months : महाविकास आघाडीचे महाराष्ट्रात सरकार आहे. पण शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट असल्याचे चित्र आहे. मराठवाड्यात २०२१ या वर्षात ८८७ शेतऱ्यांनी आत्महत्या केल्या. मागील तीन महिन्यांत आणखी २३३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.

233 farmers commit suicide in Marathwada in 3 months
मराठवाड्यात ३ महिन्यांत २३३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • मराठवाड्यात ३ महिन्यांत २३३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या
  • सर्वाधिक ७१ आत्महत्या बीड जिल्ह्यात
  • मराठवाड्यात २०२१ या वर्षात ८८७ शेतऱ्यांनी आत्महत्या केल्या

233 farmers commit suicide in Marathwada in 3 months : औरंगाबाद : शेतकऱ्यांना बांधावर जाऊन मदत करू असे म्हणणाऱ्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे महाराष्ट्रात सरकार आहे. पण शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट असल्याचे चित्र आहे. मराठवाड्यात २०२१ या वर्षात ८८७ शेतऱ्यांनी आत्महत्या केल्या. मागील तीन महिन्यांत आणखी २३३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यातील सर्वाधिक ७१ आत्महत्या बीड जिल्ह्यात झाल्या.

मराठवाड्यात ८० टक्क्यांपेक्षा जास्त कोरडवाहू शेती आहे. अनेक ठिकाणी सिंचनाचा अभाव आहे. निसर्गावर शेती अवलंबून आहे. कर्ज काढून शेती करण्याचा प्रकार मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर होत आहे. कधी प्रतिकूल निसर्गामुळे तर कधी भाव न मिळाल्याने मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. डोक्यावरील आर्थिक ताण वाढत आहे आणि कर्ज फेडणे कठीण होत आहे. या गुंतागुतींच्या समस्येतून मार्ग काढणे जमत नाही 
आणि निराशेतून मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या करत आहे.

मराठवाड्यात जानेवारी ते डिसेंबर २०२० या काळात ७७३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यानंतर जानेवारी ते डिसेंबर २०२१ या काळात मराठवाड्यात ८८७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. सध्या सुरू असलेल्या २०२२ या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत म्हणजेच जानेवारी ते मार्च २०२२ या काळात २३३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. 

जानेवारी ते मार्च २०२२ या काळात झालेल्या २३३ आत्महत्यांपैकी ७१ आत्महत्या बीड, ३५ औरंगाबाद, ३० उस्मानाबाद, २८ नांदेड, २६ जालना, १८ लातूर, १६ परभणी, ९ हिंगोली जिल्ह्यात झाल्या. जानेवारी २०२२ मध्ये ५९, फेब्रुवारी २०२२ मध्ये ७३ आणि मार्च २०२२ मध्ये १०१ आत्महत्या झाल्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी