साडेतीन वर्षीय चिमुकल्याच्या अंगावर पडली उकळती भाजी

औरंगाबाद
Updated Nov 24, 2022 | 21:02 IST | टाइम्स नाऊ मराठी

3 years old boy seriously injured in pune district ; ही घटना मावळातील पिंपोळी गावात नाथा पिंगळे यांच्या घरात घडली आहे. घटनेत गंभीर जखमी झालेल्या चिमुकल्याचे वय अवघे साडेतीन वर्षे आहे. घरात स्वयंपाक बनवण्याचं काम सुरू असताना या चिमुकल्यावर उकळती भाजी पडली. गरम भाजी अंगावर पडल्याने हा मुलगा गंभीर जखमी झाला आहे.

3 years old boy seriously injured in pune district
साडेतीन वर्षीय चिमुकल्याच्या अंगावर पडली उकळती भाजी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • एका साडेतीन वर्षीय चिमुकल्याचा अंगावर उकळती भाजी पडली
  • चिमुकल्यावर पिंपरी चिंचवडच्या सूर्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत
  • चिमुकल्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे

मावळ : लहान मुलांकडे सतत लक्ष ठेवावे लागते. कारण लहान मुलं कधी काय करतील याचा पत्ता लागत नाही.  दरम्यान, पुणे जिल्ह्यात एक विचित्र घटना घडली आहे. या घटनेमध्ये एका साडेतीन वर्षीय चिमुकल्याचा अंगावर उकळती भाजी पडली असून, या घटनेत हा चिमुकला गंभीर जखमी झाला आहे. ही घटना पुणे जिल्ह्यातील मावळमधील पिंपोळी या गावात घडली आहे.

चिमुकल्यावर पिंपरी चिंचवडच्या सूर्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मावळातील पिंपोळी गावात नाथा पिंगळे यांच्या घरात घडली आहे. घटनेत गंभीर जखमी झालेल्या चिमुकल्याचे वय अवघे साडेतीन वर्षे आहे. घरात स्वयंपाक बनवण्याचं काम सुरू असताना या चिमुकल्यावर उकळती भाजी पडली. गरम भाजी अंगावर पडल्याने हा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या पिंपरी चिंचवडच्या सूर्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

अधिक वाचा ; उद्धव ठाकरे कडाडले,कर्नाटकच्या CMचा ठाकरी शैलीत घेतला समाचार

चिमुकल्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती

दरम्यान, चिमुकल्यावर उकळती भाजी पडल्याने त्यांच्या अंगाचे सालटे सोलून निघाले आहे. त्याला तात्काळ उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले असले तरी त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती मिळाली डॉक्टरांनी दिली आहे.

अधिक वाचा ; स्वत:हून राजीनामा द्या, मिळतील चांगले फायदे, अ‍ॅमेझॉनची ऑफर 

औरंगाबादमध्ये उकळत्या वरणात पडला होता मुलगा

उकळत्या वरणात पडून 5 वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना औरंगाबाद जिल्ह्यात घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कुटुंबातील सदस्यांनी सदर लहानग्या मुलाकडे लक्ष दिल्याने तो खेळत खेळत वरणाच्या पतील्याकडे गेला आणि त्यामध्ये पडला. वरण एकदम गरम असल्याने त्याच्या अंगाचे पूर्ण कातडे निघाले होते.

अधिक वाचा ; मित्रासोबत प्रणय करणाऱ्या मुलीला फेवीक्विकनं चिपकवलं,नंतर..

उपचारादरम्यान झाला 5 वर्षीय मुलाचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, योगीराज नारायण आकोदे असं वरणात पडून मृत्यू झालेल्या 5 वर्षीय चिमुकल्यांचे नाव आहे. 5 वर्षीय योगीराज वरणाच्या भांड्यात पडल्यानंतर तो गंभीर जखमी झाला होता. त्याला तात्काळ वरणाच्या भांड्यातून बाहेर काढण्यात आले.आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचार सुरु असतानाच या 5 वर्षीय चिमुकल्याचा घाटी रुग्णालयात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी