36 ST employees suspended उस्मानाबाद जिल्ह्यातील ३६ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई , निलंबन करून जखमेवर मीठ, वाद पेटणार ?

36 ST employees suspended in Osmanabad district : एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या ५४२ जणांचे निलंबन करण्यात आले त्यात उस्मानाबाद जिल्ह्यातील 6 आगारातील 36 कर्मचारी यांचा समावेश आहे

36 ST employees suspended in Osmanabad district
उस्मानाबाद जिल्ह्यातील ३६ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आंदोलन करणाऱ्या एसटीच्या कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करण्यास सुरुवात
  • आतापर्यंत राज्यातील ५४२ एसटी कर्मचारी निलंबित
  • वेळेवर पगार मिळत नसल्याने व तुटपुंजी पगार असल्याने कर्मचारी आक्रमक

36 ST employees suspended उस्मानाबाद : गेल्या काही दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. विविध मागण्यासाठी एसटीचे कर्मचारी आंदोलन करत असल्यामुळे एसटी बंद आहे. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होताना दिसत आहे. मात्र, आता आंदोलन करणाऱ्या एसटीच्या कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या २ दिवसांपूर्वी सुमारे साडेतीनशे पेक्षा जास्त एसटीच्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. दरम्यान, आता उस्मानाबाद जिल्ह्यातील ६ आगारातील ३६ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. (36 ST employees suspended in Osmanabad district)

आतापर्यंत राज्यातील ५४२ एसटी कर्मचारी निलंबित

दरम्यान, एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या ५४२ जणांचे निलंबन करण्यात आले त्यात उस्मानाबाद जिल्ह्यातील 6 आगारातील 36 कर्मचारी यांचा समावेश आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात या आंदोलनात सहभागी कर्मचारी यांच्यावर प्रथमच निलंबनाची कारवाई करण्यात आली त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

या आगारातील एवढे कर्मचारी करण्यात आले निलंबित

मंगळवारी ३७६ कर्मचारी याचे तर बुधवारी २० जिल्ह्यातील ५४२ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यात औरंगाबाद १०, बीड २२, परभणी २५, नाशिक ४०, अहमदनगर २०, जळगाव २८,  पुणे २६, सांगली ५८, सातारा २ , उस्मानाबाद जिल्ह्यातील ३६, नागपूर ४६, वर्धा १०, भंडारा ३०, चंद्रपूर १५, अकोला २०,  बुलढाणा ३४, यवतमाळ २०, अमरावती २०,  सोलापूर ३५ तर रायगड जिल्ह्यातील १९ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले. एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी सुरू असलेल्या कर्मचारी यांचे निलंबन करण्यास सरकारने सुरुवात केली आहे.

वेळेवर पगार मिळत नसल्याने व तुटपुंजी पगार असल्याने कर्मचारी आक्रमक

एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. वेळेवर पगार मिळत नसल्याने व तुटपुंजी पगार असल्याने कर्मचारी आक्रमक झाले असुन राज्य सरकार आणखी किती कर्मचारी यांचा बळी घेणार असा सवाल केला आहे. दरम्यान, उस्मानाबाद जिल्ह्यात एसटी कर्मचारी, वाहक व चालक यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे.  कर्नाटक , गुजरात यासह अन्य राज्यात एसटी कर्मचारी यांना अधिक वेतन दिले जाते. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात एसटी कर्मचारी यांना कमी वेतन दिले जात आहे त्यामुळे कर्मचारी यांच्यावर अन्याय होत आहे असा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.

 

निलंबन करून त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम

दरम्यान, मागण्या मान्य होईपर्यंत एकही बस आगाराच्या बाहेर जाणार नाही असा इशारा देत मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा पावित्रा आंदोलकानी घेतला आहे. त्यामुळे आगामी काळात आंदोलन पेटणार असल्याचे दिसते. समस्या व भावना मांडताना कर्मचारी यांना अश्रू अनावर होत रडू कोसळत आहे मात्र सरकारला जात येत नसुन निलंबन करून त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केल्याचा व आंदोलन दडपून टाकण्यासाठी निलंबनाचे दबावतंत्र वापरल्याचा आरोप होत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी