समर्थ रामदास स्वामींच्या जन्मगावातील राम मंदिरातून पंचधातूच्या दुर्मिळ मूर्तींची चोरी

450 years old idol stolen from ram mandir jamba samarth birthplace of samarth ramdas swami : समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मगाव असलेल्या जालना जिल्ह्यातील जांब समर्थ गावातील राम मंदिरातून ४५० वर्षांपूर्वीच्या प्राचीन ऐतिहासिक मूर्तींची चोरी झाली.

450 years old idol stolen from ram mandir jamba samarth birthplace of samarth ramdas swami
समर्थ रामदास स्वामींच्या जन्मगावातील राम मंदिरातून पंचधातूच्या दुर्मिळ मूर्तींची चोरी  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • समर्थ रामदास स्वामींच्या जन्मगावातील राम मंदिरातून पंचधातूच्या दुर्मिळ मूर्तींची चोरी
  • चोरीची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल
  • तपास सुरू

450 years old idol stolen from ram mandir jamba samarth birthplace of samarth ramdas swami : समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मगाव असलेल्या जालना जिल्ह्यातील जांब समर्थ गावातील राम मंदिरातून ४५० वर्षांपूर्वीच्या प्राचीन ऐतिहासिक मूर्तींची चोरी झाली. मंदिरातून समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापन केलेल्या राम सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्तींची, ऐतिहासिक पंचायतनाची (राम, लक्ष्मण, सीता, भरत, शत्रुघ्न) तसेच रामदास स्वामी झोळीत ठेवत असलेल्या आणि दंडात बांधत असलेल्या मारोतीच्या मूर्तींची पण चोरी झाली.

महाराष्ट्र हादरला ! हात पाय बांधून मजुरांना बेदम मारहाण, पहा घटनेचा व्हिडीओ

चोरीची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तपास सुरू आहे. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री तीनच्या सुमारास चोरी केली. पाळत ठेवून मंदिरातील चावीचा वापर करून चोरी करण्यात आली. 

तारीख ठरली, दीड लाखांचा खर्चही केला पब्लिकही जमली पण कीर्तनकार महाराजचं गायब; इंदुरीकर महाराजांवर गावकरी संतापले

विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार राजेश टोपे यांनी चोरीचा मुद्दा उपस्थित केला. राज्य शासनाने जांब समर्थ गावाला तीर्थक्षेत्र आणि राम मंदिराला तीर्थस्थान म्हणून जाहीर केले आहे. यामुळे चोरीच्या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तपास करावा, अशी मागणी आमदार राजेश टोपे यांनी केली.

समर्थ रामदास स्वामी यांनी १५३५ मध्ये राम मंदिरात मूर्तींची स्थापना केली होती. या पंचधातूच्या तेजस्वी मूर्ती चोरणाऱ्या चोरट्यांना लवकर पकडावे आणि मूर्तींची पुन्हा स्थापना करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. नागरिकांमध्ये चोरीच्या घटनेची माहिती मिळाल्यापासून संतापाचे वातावरण आहे.

मंदिर बंद केल्यानंतर चावी विशिष्ट ठिकाणी ठेवली जाते. पाळत ठेवून चोरट्यांनी चावी ठेवण्याचे ठिकाण बघून ठेवले आणि तिथून चावी ताब्यात घेतली. मंदिरात प्रवेश करून चोरी केली. नंतर पुन्हा मंदिर बंद करून चावी ज्या ठिकाणी ठेवली जाते तिथेच पुन्हा नेऊन ठेवली असे प्रथमदर्शनी आढळले आहे. अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, घनसांगीचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तपासाशी संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या आणि पोलिसांनी तपास सुरू केला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी