उकळत्या वरणात पडला 5 वर्षाचा मुलगा, तडफडून झाला मृत्यू

5-year-old boy dies after falling into boiling vegetables : योगीराज नारायण आकोदे असं वरणात पडून मृत्यू झालेल्या 5 वर्षीय चिमुकल्यांचे नाव आहे. 5 वर्षीय योगीराज वरणाच्या भांड्यात पडल्यानंतर तो गंभीर जखमी झाला होता.

5-year-old boy dies after falling into boiling vegetables
उकळत्या वरणात पडला 5 वर्षाचा मुलगा, तडफडून झाला मृत्यू  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • उकळत्या वरणात पडून 5 वर्षीय बालकाचा मृत्यू
  • औरंगाबाद जिल्ह्यात घडली धक्कादायक घटना
  • उपचारादरम्यान झाला 5 वर्षीय बालकाचा मृत्यू

औरंगाबाद : उकळत्या वरणात पडून 5 वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना औरंगाबाद जिल्ह्यात घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कुटुंबातील सदस्यांनी सदर लहानग्या मुलाकडे लक्ष दिल्याने तो खेळत खेळत वरणाच्या पतील्याकडे गेला आणि त्यामध्ये पडला. वरण एकदम गरम असल्याने त्याच्या अंगाचे पूर्ण कातडे निघाले. काही वेळातच त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे.

उपचारादरम्यान झाला 5 वर्षीय मुलाचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, योगीराज नारायण आकोदे असं वरणात पडून मृत्यू झालेल्या 5 वर्षीय चिमुकल्यांचे नाव आहे. 5 वर्षीय योगीराज वरणाच्या भांड्यात पडल्यानंतर तो गंभीर जखमी झाला होता. त्याला तात्काळ वरणाच्या भांड्यातून बाहेर काढण्यात आले.आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचार सुरु असतानाच या 5 वर्षीय चिमुकल्याचा घाटी रुग्णालयात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. 

घरात पाहुणे आल्याने घरात स्वयंपाकाची तयारी सुरु होती.

दरम्यान, योगीराज नारायण आकोदे हा त्याच्या कुटुबीयांसोबत हसनाबाद येथे राहत होता. योगीराज आपल्या आईसोबत खुलताबाद तालुक्यातील सोबलगांव येथे प्रदिप जाटवे यांच्याकडे आला होता. प्रदीप जाटवे यांच्या घरी पाहुणे येणार होते यामुळे त्यांच्या घरी स्वयंपाक सुरू होता. सायंकाळी पाहुण्यांसाठी पाहुणचार सुरु असताना योगीराज हा वरण बनविलेल्या भांड्याजवळ आला. यावेळी तोल जाऊन तो उकळत्या वरणाच्या भांड्यात पडला. यावेळी त्याला तात्काळ वरणाच्या भांड्यातून बाहेर काढण्यात आले. उपचारासाठी या बालकाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, वरण गरम असल्याने तो चांगलाच भाजला गेला असल्याने त्याचा मृत्यू झाला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी