'या' जिल्ह्यातील १२ कुटुंबातील ५३ जणांनी स्वीकारला हिंदू धर्म, आणखी ६५ जण धर्मांतर करण्याच्या तयारीत

53 people converted to hinduism : पैठणच्या वेदशास्त्र संपन्न पंडितांनी हिंदुधर्म शास्रानुसार सदर धर्मविधीचे पौरोहित्य केले आहे. तर , ब्राह्मण सभेने यासाठी पुढाकार घेऊन हा ऐतिहासिक निर्णय घेतला असल्याची माहिती आहे.

53 people  converted to hinduism
'या' जिल्ह्यात १२ कुटुंबातील ५३ जणांनी स्वीकारला हिंदू धर्म  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ख्रिश्चन धर्माचा त्याग करून हिंदू धर्मवापसी करता येईल का? अशी विचारणा करण्यात आली होती
  • शांतीब्रम्ह नाथमहाराजांच्या समाधीसमोर विधीवत 'धर्मवापसी' सोहळा पार पडला
  • २२ ख्रिस्ती कुटुंबातील जवळपास ६५ महिला पुरुष ख्रिश्चन धर्माचा त्याग करण्याची इच्छा व्यक्त केली आहे​

औरंगाबाद : १२ कुटुंबातील ५३ महिला-पुरुषांनी ख्रिश्चन  धर्माचा त्याग करुन विधीवत हिंदुधर्म स्विकारला आहे. औरंगाबादच्या पैठण येथील नाथमंदिरात हा सोहळा पार पडला आहे. शनिवारी मंठा (जिल्हा जालना) येथील धर्मजागरण विभाग व नाथवंशज यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला आहे.

ख्रिश्चन धर्माचा त्याग करून हिंदू धर्मवापसी करता येईल का? अशी विचारणा करण्यात आली होती

पैठणच्या वेदशास्त्र संपन्न पंडितांनी हिंदुधर्म शास्रानुसार सदर धर्मविधीचे पौरोहित्य केले आहे. तर , ब्राह्मण सभेने यासाठी पुढाकार घेऊन हा ऐतिहासिक निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. 'जालना जिल्ह्यातील मंठा येथील १२ कुटुंबातील ५३ ख्रिश्चन महिला पुरुषांनी पुन्हा हिंदु धर्मात येण्याची इच्छा व्यक्त केली होती. ख्रिश्चन धर्माचा त्याग करून हिंदू धर्मवापसी करता येईल का?, अशी विचारणा झाल्यावर पैठणच्या ब्राह्मण सभेच्या वतीने पुढाकार घेण्यात आला. असल्याची माहिती पैठण ब्राह्मण सभेचे अध्यक्ष सुयश कमलाकर शिवपुरी यांनी दिली आहे.

शांतीब्रम्ह नाथमहाराजांच्या समाधीसमोर विधीवत 'धर्मवापसी' सोहळा पार पडला

सदर धर्मावापासीचा सोहळा पार पडत असताना यावेळी संत एकनाथ महाराज यांचे १४ वे व १५ वे वंशज यांच्यासह पैठणचे वेदशास्त्र संपन्न ब्रम्हवृंदांची यांची देखील उपस्थिती होती. स्वेच्छेने धर्मांतर करायचे असल्याने धार्मिक विधी करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार नाथमंदिरात शांतीब्रम्ह नाथमहाराजांच्या समाधीसमोर विधीवत 'धर्मवापसी' सोहळा पार पडला.

या सर्व परिवारांचे स्वागत धर्मांतरानंतर जंगी स्वागत करण्यात आले

या सर्व परिवारांचे स्वागत व पुजन हभप नाथवंशज रावसाहेब महाराज गोसावी व नाथवंशज रघुनाथ महाराज गोसावी (पालखीवाले) किर्तनमहर्षी प्रफुल्लबुवा तळेगावकर महाराज यांनी केले. या पार्श्वभूमीवर संत एकनाथ महाराज समाधी मंदिर (बाहेरील नाथमंदिर) येथे धार्मिक विधी पार पडला. 

२२ ख्रिस्ती कुटुंबातील जवळपास ६५ महिला पुरुष ख्रिश्चन धर्माचा त्याग करण्याची इच्छा व्यक्त केली आहे

आणखी २२ ख्रिस्ती कुटुंबातील जवळपास ६५ महिला पुरुष ख्रिश्चन धर्माचा त्याग करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे ५ जानेवारी रोजी धार्मिक मुहूर्तावर पैठण येथील नाथमंदिरातच या धर्मांतर विधीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे. हे सर्वजण मंठा तालुक्यातील असून १२ कुटुंबातील ५३ ख्रिश्चन महिला पुरुषांनी धर्मांतर केल्यानंतर यांनी हा निर्णय घेतला आहे. ब्राह्मण सभेच्या पुढाकाराने ही 'धर्मवापसी' केली जाणार आहे. अशी माहिती पैठण ब्राह्मण सभेचे अध्यक्ष सुयश शिवपुरी यांनी दिली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी