बीड : ट्रक आणि क्रुझरच्या भीषण अपघातात ७ जण जागीच ठार (7 people died on the spot) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान, सदर घटनेत क्रुझरचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे. अंबाजोगाई - लातूर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. महामार्गावरील नंदगोपाल दूध डेअरीजवळ सकाळी १० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. मराठवाड्यात गेल्या काही महिन्यांपासून अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. उस्मानाबाद , लातूर , बीड , आणि औरंगाबाद या जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे.
अधिक वाचा ; चीन:शांघायमध्ये लॉकडाऊन, झिरो कोविड पॉलिसीमुळे नागरिक त्रस्त
सदर घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला असून, मृतक हे सर्व लातूर जिल्ह्यातील आर्वी येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, महामार्गावर झालेल्या ट्रक आणि क्रुझर यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती की, क्रुझर गाडीचा अक्षरश: चक्काचूर झाला असून, ७ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
अधिक वाचा ; देशातील खाद्यतेल महागणार...इंडोनेशियाची पामतेल निर्यातबंदी
अपघातात मृत्यू झालेल्या मयताची नावे अद्याप समोर आली नसून घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. या अपघातात जखमी झालेल्यांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हे सर्व जण आज सकाळी नातेवाईकांकडे कार्यक्रमाला जात असताना ट्रक आणि क्रुझरची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातामुळे महामार्गावर काही प्रमाणात वाहतूक कोंडी सुद्धा झाली होती. मात्र, स्थानिक नागरिकांनी जखमींना तत्काळ रुग्णालयात पाठवून वाहनांना हटवून वाहतूक सुरळीत करून दिली.
अधिक वाचा ; या शेतकऱ्यांना नाही मिळणार PM किसान योजनेचा ११ वा हप्ता