Aurangabad Crime News : औरंगाबादहून मुंबईकडे जाणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसवर मध्यरात्री 8 ते 10 जणांनी सशस्त्र दरोडा टाकला. दौलताबाद-पोटूळ दरम्यान ही घटना घडली आहे. सिग्नलला कापड बांधून रेल्वे थांबवून आठ ते दहा जणांच्या टोळीने लुटमार केल्याची माहिती मिळत आहे. जवळपास अर्धा तास हा सगळा प्रकार सुरू होता. दरम्यान एक महिलेच्या गळ्यातील चैन आणि इतर वस्तू चोरल्याची प्राथमिक माहिती सध्या मिळत आहे, रेल्वे डब्बा S5 ते S9 वर दगडफेक करण्यात आली असून घटनास्थळी अॅम्बुलन्स देखील उभी होती दरम्यान हे दरोडेखोर अॅम्बुलन्समधून आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे,
नंदीग्राम एक्स्प्रेस आणि नांदेड मनमाड पॅसेंजरवर दरोडा
5 एप्रिल रोजी अशाच प्रकारे नंदीग्राम एक्स्प्रेस आणि नांदेड मनमाड पॅसेंजर रेल्वे थांबवून लुटमार केल्याची घटना घडली होती. 5 एप्रिलला शुक्रवारी रात्री 12.55 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती देऊनही पोलीस यंत्रणा सक्रिय न झाल्याने रात्री पावणेतीन वाजेच्या सुमारास नांदेड-मनमाड या पॅसेंजर रेल्वेला अशाच प्रकारे थांबवून दरोडेखोरांनी शस्त्राचा धाक दाखवून प्रवाशांना लुटल्याची दुसरी घटना घडल्याने प्रवाशांत खळबळ उडाली.
याप्रकरणी औरंगाबाद लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. मुंबईहून औरंगाबाद मार्गे नांदेडला निघालेली नंदीग्राम एक्स्प्रेस रेल्वेगाडी शुक्रवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास लासूर स्टेशन येथून औरंगाबादकडे येत होती. त्यावेळी देखील पोटूळ रेल्वे स्टेशन येथेच दरोडा पडला होता.