मुख्यमंत्र्यांचा संकल्प ठरला फोल ! राज्यात तब्बल 'एवढ्या' आत्महत्या, मराठवाड्याचा आकडा मोठा

89 suicides in Maharashtra state in 23 days : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शपथ घेऊन आज २३ दिवस पूर्ण होत आहेत. या २३ दिवसात तब्बल राज्यातील ८९ शेतकऱ्यांनी आपले आयुष्य संपविले आहे. यामध्ये मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा आकडा मोठा आहे. गेल्या २३ दिवसांत मराठवाड्यातील तब्बल ४६ शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं आहे.

89 suicides in Maharashtra state in 23 days
राज्यात तब्बल 'एवढ्या' आत्महत्या, मराठवाड्याचा आकडा मोठा   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिला संकल्प हा शेतकऱ्यांबद्दल केला होता
  • २३ दिवसांत मराठवाड्यातील ४६ शेतकऱ्यांनी आत्महत्या करत संपविले आयुष्य
  • पावसामुळे आणखी आत्महत्या वाढण्याची शक्यता?

Farmer Suicide : औरंगाबाद : महाविकासआघाडी सरकर कोसळल्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे हे विराजमान झाले. शिंदे यांनी १ जुलै रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिला संकल्प हा शेतकऱ्यांबद्दल केला, तो म्हणजे राज्यात एकही शेतकऱ्याची आत्महत्या होऊ देणार नाही असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होत. मात्र, मुख्यमंत्री शिंदे यांच्या या संकल्पनंतर राज्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. १ जुलै पासून राज्यात तब्बल ८९ शेतकऱ्यांनी आपले आयुष्य संपविले आहे. या शेतकऱ्यांमध्ये मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा आकडा मोठा आहे. त्यामुळे, शिंदे यांनी शपथविधी नंतर केलेला संकल्प हा फोल ठरत असल्याचं बोललं जात आहे.

अधिक वाचा ; पैशांप्रामाणे ATM मधून निघणार गहू-तांदूळ; कशी असेल सुविधा

२३ दिवसांत मराठवाड्यातील ४६ शेतकऱ्यांनी आत्महत्या करत संपविले आयुष्य

हाती आलेल्या आकड्यानुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शपथ घेऊन आज २३ दिवस पूर्ण होत आहेत. या २३ दिवसात तब्बल राज्यातील ८९ शेतकऱ्यांनी आपले आयुष्य संपविले आहे. यामध्ये मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा आकडा मोठा आहे. गेल्या २३ दिवसांत मराठवाड्यातील तब्बल ४६ शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यतील शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे.

अधिक वाचा : 'अभिव्यक्तीच्या नावाखाली न्यूड फोटो चालता तर बुरखा का नको?'

पहा कोणत्या जिल्ह्यात किती आत्महत्या?

१ ) औरंगाबाद – १५  २ ) बीड – १३, ३ ) उस्मानाबाद – ०५,  ४ ) परभणी – ०६, ५ ) नांदेड – ०२  ६ ) जालना ०५, ७ ) यवतमाळ – १२, ८ ) अहमदनगर – ०७, ९ ) जळगाव – ०६, १० ) बुलडाणा – ०५, ११ ) अमरावती – ०४, १२ ) वाशीम – ०४, १३ ) अकोला – ०३, १४ ) भंडारा – चंद्रपूर – ०२

अधिक वाचा ; VIDEO: जाणून घ्या शमशेरा पाहिल्यानंतर चाहते काय म्हणाले 

पावसामुळे आणखी आत्महत्या वाढण्याची शक्यता?

राज्यात गेल्या ककाही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस सुरु आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची पिके वाहून गेली आहेत. त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. दरम्यान, शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून आणखी शेतकऱ्यांसाठी काही ठोस मदत जाहीर केली नाही. त्यामुळे, शेतकरी शिंदे यांच्याकडे मदतीची आस घेऊन बसला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी