Crime News : लाईट बंद केली आणि 15 वर्षीय शाळकरी मुलाचा केला गेम!

A 15-year-old boy was killed by his cousin : श्रीकृष्णवर लाईट बंद करून हल्ला करण्यात आला. हल्ला झाल्यावर गावातील लोकांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी आरडोओरड करायला सुरुवात केली. यानंतर हल्लेखोरांनी पळ काढला. याप्रकरणी वडवणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस सदर घटनेचा सखोल तपास करत आहेत.

A 15-year-old boy was killed by his cousin
लाईट बंद केली आणि 15 वर्षीय शाळकरी मुलाचा केला गेम!  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • बीडमध्ये 15 वर्षीय शाळकरी मुलाचा झाला खून
  • घरगुती वादातून चुलत भावानेच ही हत्या केली?
  • हल्ला करून हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला.

बीड : राज्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचे दिसून येत आहे. बीड जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून हत्येच्या घटनेत मोठी वाढ होताना दिसत आहे. दरम्यान, बीडमध्ये आणखी एका हत्येच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. ज्यामध्ये एका 15 वर्षीय शाळकरी मुलाचा निर्दयी खून करण्यात आला आहे. अवघ्या 15 वर्षाच्या मुलाचा खून करण्यात आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना बीड जिल्ह्याच्या वडवणी तालुक्यातील पिंपरखेड या गावात घडली आहे. 15 वर्षीय मुलावर वार करण्यात आले होते. त्यानंतर त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन जात असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.

अधिक वाचा ; Ullu Appवर आहेत अशा काही वेबसिरीज ज्या एकट्यानेच पाहू शकतात

घरगुती वादातून चुलत भावानेच ही हत्या केली?

मिळालेल्या माहितीनुसार, सुरज श्रीकृष्ण शिंदे वय 15 वर्षे असं हत्या झालेल्या शाळकरी मुलाचं नावं आहे. घरगुती वादातूनचं श्रीकृष्ण याची हत्या करण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे. चुलत भावानेच ही हत्या केली असल्याचे समोर आले असून, आरोपी चुलत भावाने रात्री आठच्या सुमारास गावातील लाईट बंद करून भर चौकात सुरज शिंदे याच्यावर धारधार कोयत्याने सपासप वार केले. ज्यामध्ये श्रीकृष्णचा मृत्यू झाला आहे. हा हल्ला इतका भयानक होता की घटनेनंतर उपचारासाठी नेत असतानाच मुलाचा मृत्यू झाला.

अधिक वाचा ; हिवाळ्यात ही पेये तुम्हाला ठेवतील निरोगी, त्वचा होईल चमकदार 

हल्ला करून हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीकृष्णवर लाईट बंद करून हल्ला करण्यात आला. हल्ला झाल्यावर गावातील लोकांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी आरडोओरड करायला सुरुवात केली. यानंतर हल्लेखोरांनी पळ काढला. याप्रकरणी वडवणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस सदर घटनेचा सखोल तपास करत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी