Suicide Case: बहिणीच्या लग्नासाठी घेतलेल्या कर्जापोटी भावाची आत्महत्या

औरंगाबाद
Updated Nov 01, 2022 | 10:56 IST | टाइम्स नाऊ मराठी

A 20-year-old farmer from Beed committed suicide : बहिणीच्या लग्नाचे कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेतून या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. मागील तीन वर्षांपासून सतत शेती न पिकल्याने शेतकऱ्याच्या 20 वर्षीय मुलाने घरातील पत्र्याच्या आडूला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

A 20-year-old farmer from Beed committed suicide
बहिणीच्या लग्नासाठी घेतलेल्या कर्जापोटी भावाची आत्महत्या  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • तीन वर्षांपासून सतत शेती न पिकल्याने शेतकऱ्याच्या 20 वर्षीय मुलाने घेतली आत्महत्या
  • एकाच दिवशी गेवराई तालुक्यात 2 शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या
  • पावसाने पिकाचे नुकसान झाले कुटुंब चालवायचे कसं या विवंचनेतून एका शेतकऱ्याने केली आत्महत्या

बीड : गेल्या काही दिवसांमध्ये मराठवाड्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्याच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतल्याने मराठवाड्यातील अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. बीड जिल्ह्यामध्ये देखील गेल्या काही दिवसांपासून शेतकरी आत्महत्येचं सत्र सुरूच आहे. आज पुन्हा एकदा एका 20 वर्षीय  तरुण शेतकऱ्याने आत्महत्या करत आपले आयुष्य संपवले आहे. बहिणीच्या लग्नाचे कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेतून या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. मागील तीन वर्षांपासून सतत शेती न पिकल्याने शेतकऱ्याच्या 20 वर्षीय मुलाने घरातील पत्र्याच्या आडूला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. दिपक बाळासाहेब मुंडे असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील देवगाव येथे सदर घटना घडली आहे. घरी कुणी नसल्याचे पाहून घरातील पत्र्याच्या लोखंडी आडूला दोरीच्या मदतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. (a 20 year old farmer youth from beed committed suicide)

अधिक वाचा ; फडणवीसांचा गौप्यस्फोट; माझ्या फोनमुळे बच्चू कडू गेले गुवाहटी

एकाच दिवशी गेवराई तालुक्यात 2 शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शेतकरी आत्महत्येचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी आत्महत्याकडे वळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. बीड जिल्ह्यात रविवारी एकाच दिवशी गेवराई तालुक्यात 2 शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं आहे. अमोल रानमारे (वय 24 रा. धोंडराई ता. गेवराई) अर्जुन धोत्रे (वय 40 रा. भोगलगाव ता. गेवराईः असं आत्महत्या करुन जीवन संपविलेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत. तर या दोन्ही शेतकऱ्यांनी अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाले, याच कारणामुळे दोघांनी देखील आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

अधिक वाचा : आला! भारताचा स्वतःचा डिजिटल रुपया आला...आरबीआयची चाचणी सुरू 

पावसाने पिकाचे नुकसान झाले कुटुंब चालवायचे कसं या विवंचनेतून एका शेतकऱ्याने केली आत्महत्या

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसाआधीच अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने पिकाचे नुकसान झाले कुटुंब चालवायचे कसे यावे विवंचनेतून 30 वर्षीय शेतकऱ्याने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बीड औरंगपूर येथे घडली. सदर घटनेमुळे नारायण सुंदर पडूळे असं मयत शेतकऱ्याचं नाव आहे. अतिवृष्टीमुळे कापसाचे पीक पाण्याखाली गेले बँकेचे कर्ज फेडायचे कसे या नैराश्यातून संबंधित शेतकऱ्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे नातेवाईकांनी सांगितलं आहे.

अधिक वाचा ; नोव्हेंबरमध्ये ओटीटीवर रिलीज होणार 'हे' सिनेमा आणि वेबसीरिज

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी