Aurangabad Crime News : जादुटोणा केल्याच्या संशयावरून तरुणाने स्वयंघोषित वैद्याची केली हत्या

A 24-year-old youth killed a 42-year-old self-proclaimed vaidya ; औरंगाबाद शहरातील  मिटमिटा भगात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी सदर घटनेचा बारकाईने तपास सुरु केला होता. दरम्यान, या हत्याकांडचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे.

A 24-year-old youth killed a 42-year-old self-proclaimed vaidya
24 वर्षीय तरुणाने 42 वर्षीय स्वयंघोषित वैद्यचा केला खून   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • जादुटोणा केल्याच्या संशयावरून तरुणाने स्वयंघोषित वैद्याची केली हत्या
  • ४२ वर्षीय स्वयंघोषित वैद्याचा 24 वर्षीय तरुणाने खून केला
  • एका महिलेच्या उपचाराच्या बहाण्याने मीटमिटा भागातील झुडुपात नेऊन केला खून

औरंगाबाद : जादुटोणा केल्याने आपला फर्निचरचा व्यवसाय ठप्प झाला असा संशय एका युवकाला आला. याच संशायवरून 24 वर्षांच्या तरुणाने एका 42 वर्षांच्या स्वयंघोषित वैद्याची हत्या केली. आजारी महिलेवर उपचार करायचे आहेत असे सांगत तरुणाने स्वयंघोषित  वैद्याला मीटमिटा भागातील झुडुपात नेले आणि तिथेच त्याची हत्या केली. नंतर तरुणाने गुन्ह्याची कबुली दिली,

अधिक वाचा : इलॉन मस्क आणि पराग अग्रवालचे संबंध का बिघडले, नेमके काय झाले

काही दिवसांपूर्वी सदर घटना घडली होती

औरंगाबाद शहरातील  मिटमिटा भगात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी सदर घटनेचा बारकाईने तपास सुरु केला होता. या हत्याकांडचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याचबरोबर सदर हत्या का झाली? या हत्येमागील नेमकं कारण काय आहे हे देखील पुढे आले आहे. पोलिसांनी सदर घटनेतील पकडलेल्या आरोपीने आपला गुन्हा कबुल केला आहे. जादुटोणा केल्याने फर्निचरचा व्यवसाय ठप्प झाल्याच्या संशयावरून आपण 42 वर्षीय स्वयंघोषित वैद्याला महिलेच्या उपचाराच्या बहाण्याने मीटमिटा भागातील झुडुपात नेऊन मारलं असल्याची कबुली सदर आरोपी तरुणाने दिली आहे. सदर घटनेतील हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव कारभारी सिद्धू शेम्बडें (वय -४२) (रा. घोंशी, ता.घनसान्वंगी, जि. जालना) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर सद्दाम सय्यद सिराज असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

अधिक वाचा ; 43 वर्षांची अमृता सुभाष होणार आई, इन्स्टावरून दिली Good News

नेमकी काय आहे संपूर्ण घटना?

पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सद्दामहा व्यवसायासाठी औरंगाबदेतील वाळूज एमआयडीसीत स्थायिक झाला. त्याचं रांजणगाव परिसरात फर्निचर बनविण्याचं दुकान आहे. तर मृत कारभारी हे आरोपी सद्दाम याच्या सासुरवाडीत राहायचे. ते लोकांना औषधी द्यायचे, तसेच देवधर्माचं काम देखील करायचे. याचवेळी व्यवसाय ठप्प झाला होता. त्यामुळे कारभारी यांनीच जादुटोना केला असल्याचा संशय सद्दामला आला होता. त्यामुळे सद्दामने हत्येचा कट रचत कारभारी यांना कॉल केला आणि एका महिलेला मुलबाळ होत नाही, त्या महिलेला औषध पाहिजे, अशी थाप मारुन रांजणगाव येथे बोलावून घेतलं. सद्दाम कारभारी यांना रेल्वेपटरीजवळ असलेल्या झुडूपात घेऊन गेला. तेथे दगड आणि फावड्याच्या दांड्याने बेदम मारहान करुन त्यांची हत्या केली. मग, तेथून पळ काढला होता. अशी माहिती पोलीस सूत्राकडून मिळाली आहे.

अधिक वाचा ; Optical Illusion: शोधून-शोधून थकला तरीही सापडला नाही बूट.. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी