शिंदे गटात गेलेल्या आमदाराला मोठा झटका, शिवसेनेने राखला गड

A big blow to the MLA who joined the Shinde group : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंड केले आहेत. शिंदे यांच्या बंडात उस्माबादमधील शिवसेनेचे आमदार ज्ञानराज चौगुले आणि माजी मंत्री तानाजी सावंत हे देखील सहभागी झाले होते. तर, माजी खासदार रविंद्र गायकवाड यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याची भूमिका घेतली. दरम्यान, शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर ज्ञानराज चौगुले यांना मात्र ग्रामपंचायत निवडणुकीत मोठा झटका बसला आहे.

A big blow to the MLA who joined the Shinde group
शिंदे गटात गेलेल्या आमदाराला मोठा झटका, शिवसेनेने राखला गड   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • उमरगा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीत शिवसेने पुन्हा एकदा वर्चस्व सिध्द केले आहे
  • उमरगा तालुक्यातील एक ग्रामपंचायत कॉंग्रेसकडे तर ४ शिवसेनेकडे
  • रविंद्र गायकवाड यांच्या नेतृत्वात उमरगा तालुक्यातील चार ग्रामपंचायतींवर शिवसेनेने मिळवला विजय

उस्मानाबाद -  उमरगा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीत शिवसेने पुन्हा एकदा वर्चस्व सिध्द केले आहे. पाच पैकी चार ग्रामपंचायतवर शिवसेनेने आपला भगवा फडविला आहे. चार ग्रामपंचायतीच्या निवडणूक मतमोजणी आज शुक्रवारी पार पडली. या निवडणुकीत आमदार ज्ञानराज चौगुले यांना मोठा झटका बसला असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, तालुक्यातील ५ पैकी ४ ग्रामपंचायतीवर शिवसेनेने आपले वर्चस्व कायम ठेवेत बंडखोर आमदार ज्ञानराज चौगुले यांना मात्र झटका दिला आहे. तर माजी खासदार प्रा.रविंद्र गायकवाड यांचा करिष्मा मात्र कायम आहे.

अधिक वाचा ; लग्न जमावे म्हणून राज्यकर उपायुक्त होत असल्याचा केला बनाव

एक ग्रामपंचायत कॉंग्रेसकडे तर ४ शिवसेनेकडे

दरम्यान, उमरगा तालुक्यातील पाच ग्रामपंचातीच्या निवडणूकीत अंबरनगर ग्रामपंचायतवर कॉग्रेंसने वर्चस्व मिळवून निवडणूक बिनविरोध काढली होती. चार ग्रामपंचायतीसाठी गुरूवारी मतदान झाले होते. आज सकाळी तहसील कार्यालयात मतमोजणी करण्यात आली. यात कोरेगाव ग्रामपंचायतीच्या ८ जागा पूर्वीच बिनविरोध निघाल्या आहेत. त्यात एका जागेसाठी निवडणूक झाली होती. पांडूरंग बाबूराव खटके हे निवडणून आले. कसगी ग्रामपंचायतीत दोन जागा पूर्वीच बिनविरोध निघाल्या होत्या. यात शिवसेनेने १३ पैकी १२ जागावर वर्चस्व मिळविले. मल्लीनाथ बोरूटे, शारदाबाई अलगुडे, सावित्री पुजारी, धनराज जगदाळे, चंद्रकला मुलगे, नागरबाई गावडे, शिवाजी यमगर, हणमंत गुरव, राणी कोळी, सायबा सोनकांबळे, उस्मान मुल्ला हे उमेदवार विजयी झाले आहेत.

अधिक वाचा : पंजाबी गाण्यावर 'असा' थिरकला शाहरूख खान, Video Viral

रविंद्र गायकवाड यांच्या नेतृत्वात उमरगा तालुक्यातील चार ग्रामपंचायतींवर शिवसेनेने मिळवला विजय

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंड केले आहेत. शिंदे यांच्या बंडात उस्माबादमधील शिवसेनेचे आमदार ज्ञानराज चौगुले आणि माजी मंत्री तानाजी सावंत हे देखील सहभागी झाले होते. तर, माजी खासदार रविंद्र गायकवाड यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याची भूमिका घेतली. दरम्यान, शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर ज्ञानराज चौगुले यांना मात्र ग्रामपंचायत निवडणुकीत मोठा झटका बसला आहे. तर रविंद्र गायकवाड यांनी उमरगा तालुक्यातील चार ग्रामपंचायतींवर विजय मिळवून दाखवला आहे.

 

तुगाव ग्रामपंचायतीच्या १३ जागासाठीच्या निवडणूकीत ११ जागा शिवसेनेला

तुगाव ग्रामपंचायतीच्या १३ जागासाठीच्या निवडणूकीत ११ जागा शिवसेनेला तर दोन जागा कॉग्रेसला मिळाल्या. यात विद्यमान सरपंच व उपसरपंचाच्या पराभव झाला. सुभाष चव्हाण, झमाबाई चव्हाण, अंबुबाई दुधभाते, व्यंकट कांबळे, मोहन शिंदे, शामल चव्हाण, दिपक जोमदे, रेहानाबी जमादार, गीता माने, गणेश माने, आशाबाई माने, संजय बिराजदार, सुनीता शिंदे हे उमेदवार विजयी झाले. 

अधिक वाचा ; हिंदूंना टार्गेट केल्यास जशास तसे उत्तर देऊ : नितेश राणे

कोरेगाववाडीच्या ९ जागासाठीच्या निवडणूकीत पाच जागा शिवसेनेला

कोरेगाववाडीच्या 9 जागासाठीच्या निवडणूकीत शिवसेनेचे व्यंकट माने यांच्या पॅनेलला पाच जागा मिळवून ग्रामपंचातीवर वर्चत्व मिळविले. विजयकुमार पाटील, सुकुमारबाई महानूर, व्यंकट माने, पार्वती कुरनुरे, महानंदा महानूर, अनंत लवटे, सुनिता बाचके, मुद्रीकाबाई शेंडेगे हे उमेदवार विजयी झाले आहेत. निवडीनंतर विजयी उमेदवारानी गुलालाची उधळण केली. तहसिल कार्यालयात तहसिलदार राहूल पाटील यांच्या उपस्थितीत मतमोजणी झाली. पोलिस निरीक्षक मनोज कुमार राठोड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी