Aurangabad Crime News : अन् कुस्तीच्या आखाड्यात दोन गटात कुस्तीऐवजी सुरू झाली तुंबळ हाणामारी

A brawl between two groups in the wrestling arena : दरवर्षी फुलंब्री येथे पोळा झाला की दुसऱ्या दिवशी पाडव्यानिमित्त कुस्ती आखाडे होतात. या कुस्ती आखाड्यात पंचक्रोशीतील अनेक पहेलवान सहभागी होतात. यावर्षी देखील अनेक पहेलवानांनी कुस्ती आखाड्यात सहभाग घेतला होता. त्यामुळे, कुस्तीचा आखाडा चांगलाच गाजणार असल्याने कुस्ती पाहण्यासाठी पंचक्रोशीतील अनेक लोकं देखील सहभागी झाले होते.

A brawl between two groups in the wrestling arena
अन् कुस्तीच्या आखाड्यात दोन गटात कुस्तीऐवजी तुंबळ हाणामारी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पोळा पाडव्यानिमित्त भरलेल्या कुस्ती आखाड्यातच दोन गट आपापसात भिडले
  • पोलिसांवर झालेल्या या हल्ल्यात पोलीस निरीक्षकासह दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत
  • आखाड्यात दोन गटात कुस्तीऐवजी तुंबळ हाणामारी सुरू झाली

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील (Aurangabad District) फुलंब्री शहरात (Fulambri City) बैल पोळा हा सण झाला की दुसऱ्या दिवशी पाडव्यानिमित्त कुस्ती आखाडे होतात. मात्र, यावर्षी झालेल्या या कुस्ती आखाड्याला गालबोट लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोळा पाडव्यानिमित्त भरलेल्या कुस्ती आखाड्यातच दोन गट आपापसात भिडले असून, यामध्ये अनेकजण जखमी देखील झाले आहेत. दरम्यान, दोन गट आपापसात भिडत असताना तेथे उपस्थित असलेले पोलीस वाद मिटवण्यासाठी गेले असतादोन्ही गटातील लोकांनी पोलिसांवर देखील हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांवर झालेल्या या हल्ल्यात पोलीस निरीक्षकासह दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले असून, दोन्ही गटातील सहा जण जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या लोकावर सध्या फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले असून, यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद शहरातील घाटी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. (A brawl between two groups in the wrestling arena)

अधिक वाचा : कोरेगावमध्ये भररस्त्यात पोलीस अधिकाऱ्याला मारहाण

दरवर्षी भरणाऱ्या या आखाड्यात पंचक्रोशीतील पहेलवान सहभागी होतात

प्राप्त झालेल्या माहितीनुसार, दरवर्षी फुलंब्री येथे पोळा झाला की दुसऱ्या दिवशी पाडव्यानिमित्त कुस्ती आखाडे होतात. या कुस्ती आखाड्यात पंचक्रोशीतील अनेक पहेलवान सहभागी होतात. यावर्षी देखील अनेक पहेलवानांनी कुस्ती आखाड्यात सहभाग घेतला होता. त्यामुळे, कुस्तीचा आखाडा चांगलाच गाजणार असल्याने कुस्ती पाहण्यासाठी पंचक्रोशीतील अनेक लोकं देखील सहभागी झाले होते. लोकांच्या गर्दीचा विचार करता नेहमीप्रमाणे हा आखाडा आठवडी बाजाराच्या पटांगणात भरवण्यात आला होता. आयोजकांनी कुस्त्यांचे योग्य नियोजन केले होते. मात्र, झालेल्या तुंबळ हाणामारीत हे नियोजन विस्कळीत झाल्याचे पहायला मिळाले.

अधिक वाचा : सकाळी उठल्याबरोबर या 4 छोट्या गोष्टी...केस आणि त्वचा चमकेल

आखाड्यात दोन गटात कुस्तीऐवजी तुंबळ हाणामारी सुरू झाली

दरम्यान,सुरवातीला छोट्या-छोट्या कुस्ती पार पडल्या. त्यातच एक जण पटांगणात येण्याचा प्रयत्न करीत होता. पोलिसांनी या  युवकास अडविले आणि पाठीमागे सरक असं संगीतले. मात्र, हा युवक ऐकत नव्हता. याचवेळी दुसऱ्या गटातील दोघे तिथे आले व बाचाबाचीनंतर हाणामारी झाली. सुरवातीला झालेल्या हाणामारीमुळे हा तरुण तेथून निघून गेला. मात्र थोड्याच वेळात तो पुन्हा तिथे आपल्या मित्रांसह आला. यानंतर हा वाद मोठ्या प्रमाणात वाढत गेला. आणि अखेर आखाड्यात कुस्तीऐवजी तुंबळ हाणामारी सुरू झाली. दोन्ही गट एकमेकांवर तुटून पडले. अचानक झालेल्या या राड्यात कोण कुणाला मारत होता काहीच कळत नव्हते.

अधिक वाचा : दिवसभर भूक लागते?, मग Craving कमी करण्यासाठी खा या 5 गोष्टी 

हाणामारीत जखमी झालेल्या आरोपींची अशी आहेत नावे

अनिल शिंदे (वय ३३), बावर इलियास पटेल ( २८) शाकेर इलियास पटेल (३२), गणेश गंगाधर रघु (३६) कृष्णा रत्नाकर पाथ्रे (२४), सईद मेहमूद पटेल (२४), सोकिया निसार पटेल (२१) हे गटबाजीतील युवक तर पोलिस निरीक्षक रवींद्र निकाळजे (५३), पोलिस संजय चव्हाण (वय ३५)  हे जखमी झाले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी