शासकीय आदिवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहात शिकणाऱ्या मुलीने घेतला गळफास, पोलिसांनी हात पहिला तर होत 'असं' काही

A girl studying in the hostel of the tribal ashram school hanged herself : शासकीय आदिवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहातील इयत्ता १० वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीने खोलीतच आपल्या ओढणीने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपविल्याची घटना २१ जुलै रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली

A girl studying in the hostel of the tribal ashram school hanged herself
आदिवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहात शिकणाऱ्या मुलीने घेतला गळफास  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आश्रमशाळेच्या वसतिगृहातील इयत्ता १० वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीने घेतला गळफास
  • शाळा सुरू झाल्यानंतर ती १५ जून रोजी वसतिगृहात वास्तव्याला गेली
  • शाळा प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळेच ही घटना – नातेवाईकांचा आरोप

हिंगोली : शासकीय आदिवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहातील इयत्ता १० वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीने खोलीतच आपल्या ओढणीने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपविल्याची घटना २१ जुलै रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली आहे. सदर घटनेने जिल्हाभरात मोठी खळबळ उडाली आहे. सदर घटना हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील बोथी येथे घडली आहे. शिवानी सदाशिव वावधने असं १६ वर्षीय मुलीचे नाव होते. शिवानी वावधने ही मुलगी इयत्ता १० वीच्या वर्गात शिकत होती. शिवानीचे मूळ गाव वारंगा हे आहे. ती अतिशय हुशार देखील होती अशी माहिती मिळाली आहे.

अधिक वाचा : गोल्डन बॉयची कमाल, नीरज चोप्रा पहिल्याच प्रयत्नात फायनलमध्ये

शाळा सुरू झाल्यानंतर ती १५ जून रोजी वसतिगृहात वास्तव्याला गेली

मिळालेल्या माहितीनुसार, शिवानी इयत्ता पाचवीपासून कळमनुरी तालुक्यातील बोथी शासकीय आदिवासी आश्रमशाळेत शिकत होती. ती सध्या १० वीच्या वर्गात होती. शाळेला सुट्टी लागल्यावर शिवानी आपल्या गावी देखील गेली होती. मात्र, १५ जून रोजी शाळा सुरू झाल्यानंतर ती वसतिगृहात वास्तव्याला गेली आणि तिने असे टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. हॉस्टेलच्या वार्डन सविता विणकरे या २१ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास वसतिगृहात नियमित तपासणी करत असताना एका त्यांना शिवानीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. त्यांनी हा प्रकार मुख्याध्यापक किशन खांडरे यांच्या कानी घातला. त्यांनी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात याची माहिती दिली.

अधिक वाचा ; लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त खास Marathi Messages 

शाळा प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळेच ही घटना – नातेवाईकांचा आरोप

दरम्यान, शिवानीचे प्रेत बाळापूरच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणले असून, रात्रीच्या वेळी शवविच्छेदनाची सोय येथे नसल्याने उद्या शवविच्छेदन करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रताप दुर्गे यांनी दिली. त्याचबरोबर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची देखील माहिती मिळाली आहे. ग्रामीण रुग्णालयात नातेवाइकांनी मोठी गर्दी केली आहे. नातेवाईकांकडून शाळा प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळेच ही घटना घडल्याचा आरोप केला जात आहे.

अधिक वाचा :  उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असले तरीही आयटीआर भरा,पाहा फायदे 

शिवानीचा मृतदेह पोलिसांनी तपासला असता तिच्या डाव्या हातावर ब्लेडने कापल्याच्या खुणा आढळल्या

पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवानीचा मृतदेह पोलिसांनी तपासला असता तिच्या डाव्या हातावर ब्लेडने कापल्याच्या खुणा दिसून आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. कापलेल्या खुणा कशाच्या आहेत? याचाही देखील शोध पोलीस घेत आहेत. त्याचबरोबर, शाळा प्रशासनाने तिला त्रास दिला, माझी मुलगी शासकीय निवासी आश्रम शाळेत शिकायला असताना शाळा प्रशासनाच्या ताब्यात होती. त्यामुळेच तिने आत्महत्या केली असल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांकडून करण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी