औरंगाबाद हादरले ! कुरियर कंपनीकडून मागवण्यात आलेला शस्त्रांचा मोठा साठा जप्त,पोलिसांनी केली मोठी कारवाई,तब्बल 'एवढ्या' तलवारी मागवण्यात आल्या

a large quantity of arms was found in aurangabad : सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार तलवारी मागवणाऱ्या दोघांना क्राईमब्रँच ताब्यात घेण्यात आले आहेत. ताब्यात असलेल्या दोघांकडून चौकशी करण्यात येत असून औरंगाबादेतील ५ आणि जालन्यातील २ जणांनी ३७  तलवारी १ कुकरी मागवल्या असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. 

a large quantity of arms was found in aurangabad
कुरियर कंपनीकडून मागवण्यात आलेला शस्त्रांचा मोठा साठा जप्त  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • औरंगाबाद शहरात पुन्हा एकदा कुरियर कंपनीकडून तलवारी मागवण्यात आल्या
  • औरंगाबादेतील ५ आणि जालन्यातील २ जणांनी ३७  तलवारी १ कुकरी मागवल्या असल्याची माहिती
  • क्राईमब्रँच कडून तलवार मागवणाऱ्या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहेत

औरंगाबाद  : औरंगाबाद शहरात पुन्हा एकदा कुरियर कंपनीकडून तलवारी मागवण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान, मागवण्यात आलेल्या या सर्व तलवारी पोलिसांकडून जप्त करण्यात आल्या आहेत. औरंगाबादच्या क्रांती चौक पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. यापूर्वी देखील दोन वेळा मोठ्या प्रमाणावर कुरियर कंपनी कडून आलेला शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. औरंगाबादेतच एवढ्या मोठ्या तलवारी का येतात हे तपासणे पोलिसांसमोर मोठे आव्हान असणार आहे.

अधिक वाचा : कार घेण्याची Desire पूर्ण करण्यासाठी किती लागेल डाउनपेमेंट

क्राईमब्रँच कडून तलवार मागवणाऱ्या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहेत

सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार तलवारी मागवणाऱ्या दोघांना क्राईमब्रँच ताब्यात घेण्यात आले आहेत. ताब्यात असलेल्या दोघांकडून चौकशी करण्यात येत असून औरंगाबादेतील ५ आणि जालन्यातील २ जणांनी ३७  तलवारी १ कुकरी मागवल्या असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. त्याचबरोबर, औरंगाबादमध्ये कुरियर कंपनीकडून मागवण्यात आलेला शस्त्रांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. शहरात एका दिवशी डीटीडीसी नावाच्या कुरियर कंपनीकडून आलेल्या ३७ तलवारी आणि एक कुकरी औरंगाबादच्या क्रांती चौक पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

अधिक वाचा : सनरुफवाली Maruti Brezza आली, जाणून घ्या कारची वैशिष्ट्ये

 औरंगाबादच्या दंगलीनंतर २०१८ मध्ये देखील मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा मागवण्यात आला होता.

औरंगाबादच्या दंगलीनंतर २०१८ मध्ये देखील मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा मागवण्यात आला होता. जुलै २०२१ मध्ये ४१ तलवारी, दोन गुप्ती आणि ६ कुकरी असा शस्त्रांचा साठा पोलिसांनी जप्त केला. अशा कुरियर कंपनीद्वारे शोभेच्या वस्तू म्हणून तलवारी मागवल्या जातात आणि त्यानंतर त्याला धार लावली जाते.अशी माहिती देखील समोर आली आहे. दिल्ली, अमृतसर आणि राजस्थानमधून हे शास्त्र भिवंडीच्या एका गोडाउन मध्ये दाखल होतात आणि तिथून महाराष्ट्रभर वितरित होतात .मात्र औरंगाबाद मध्ये डीटीडीसी याच कूरियर सर्विस च्या मार्फत ही शस्त्र कसा आला असा प्रश्न देखील उपस्थित राहिला आहे. शहराच्या निराला बाजार परिसरामध्ये असलेल्या या डीटीडीसी नावाच्या कुरियर कंपनीकडे एकाच दिवशी हा एवढा मोठा शस्त्रसाठा आलाय. औरंगाबादेतच एवढ्या मोठ्या प्रमाणावर  सातत्याने  तलवारी का येतात. कुठून आणि कशी येतात याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

अधिक वाचा : या अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर पॅन्टसोबत केले असे काही, या फोटो 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी