बीड : बीड जिल्ह्यात हनुमांची भव्य मूर्ती उभारण्यात आली आहे. हनुमानाची ही मूर्ती पाहण्याससाठी लोकं मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याचं पहायला मिळत आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील डोंगर पिंपळा या ठिकाणी हनुमानाची भव्य मूर्ती उभारण्यात आली आहे. ही मूर्ती उभी करण्याच्या कामासाठी तब्बल नऊ महिन्याचा कालावधी लागला असून, फायबर ग्लास आणि काँक्रिटचा वापर करुन ही मूर्ती बनवण्यात आली आहे. त्यामुळे पुढच्या ३५ ते ४० वर्ष या मूर्तीची झीज होणार नसल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं आहे.
अधिक वाचा : कमी किंमतीत सूचीबद्ध झाला एलआयसीचा शेअर, 42,500 कोटींचा फटका
दरम्यान, हनुमानाची ही मूर्ती साठ फुटांपेक्षा जास्त उंच आणि भव्य अशी मूर्ती आहे. ही उभारण्यासाठी तब्बल ४८ लाख रुपये एवढा खर्च करण्यात आला आहे. डोंगर पिंपळा गावातील बांधकाम व्यवसायिक गोपाळ पवार यांनी आपल्या वडिलांच्या इच्छेखातर ही मूर्ती उभारली आहे रेल्वे क्षेत्रातील मान्यवर आणि गावकऱ्यांच्या उपस्थितीत या मूर्तीची विधीवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. परिसरातील नागरिक या ठिकाणी आता दर्शनासाठी गर्दी करत आहेत.
अधिक वाचा : सोन्याच्या भावात झाली वाढ, चांदी मात्र घसरली, पाहा ताजा भाव
अधिक वाचा ; भारताविरूद्धच्या टी-२० मालिकेसाठी आफ्रिकेच्या संघाची घोषणा
अधिक वाचा : मोदींच्या भाषेत सांगायला गेलं तर भारताची चड्डी काढली आहे
अधिक वाचा : सोन्याच्या भावात झाली वाढ, चांदी मात्र घसरली, पाहा ताजा भाव