पतीने घेतलेले पैसे परत न केल्याने "तू माझ्यासोबत चल म्हणत महिलेची छेड", बीड जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार

A man molested a woman in Beed district: पीडितेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तू कोठेही जा तुला व तुझ्या पतीला सोडणार नाही, असे म्हणत जिवे मारण्याची धमकी सीताराम बडे दिली आहे.

A man molested a woman in Beed district
"तू माझायासोबत चल म्हणत महिलेची छेड" बीड जिल्ह्यातील प्रकार  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • दोन्हीवेळा शिवाजीनगर पोलिसांनी जुजबी कारवाई केली
  • ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता त्याने पुन्हा गाड्यावर येऊन मारहाण
  • गुन्हा नोंदवून देखील ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता पुन्हा मारहाण

बीड : बीड जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचं पहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यात खून, महिलांना छेडछाड अश्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यात पुन्हा एक धक्कादायक घटना घडली आहे. पतीने घेतलेले उसने पैसे परत कर अन्यथा तू माझ्यासोबत चल, असे म्हणत भाजीविक्रेत्या महिलेस मारहाण करून दोन वेळा भररस्त्यात छेड काढली असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, दोन्हीवेळा शिवाजीनगर पोलिसांनी जुजबी कारवाई केली असल्याचं प्रकार घडला आहे.

नेमकी काय घडली घटना?

सदर प्रकरणातील महिला या गाड्यावर भाजीपाला विकून आपल्या संसाराचा गाडा चालवतात. त्यांच्या पतीने सीतारात प्रभू बडे याच्याकडून काही कामानिमित्त उसने पैसे घेतल्याची माहिती समोर आली आहे. जून २०२१ मध्ये घेतलेले पैसे पती परत करत नव्हता त्यामुळे पतीकडील उसण्या पैशावरून सीतारात प्रभू बडे (रा.मित्रनगर) याने छेड काढून गुंडांच्या साहाय्याने दाबदडप करण्याचा देखील प्रकार घडला होता. त्यामुळे पीडित महिलेने  १२ सप्टेंबर रोजी निवेदनाद्वारे थेट जीवन संपविण्याची परवानगी देण्याची मागणी केली आहे. पीडित ३८ वर्षीय महिला मूळ चिंचवण (ता.वडवणी) येथील रहिवासी असून, सध्या शहरातील मित्रनगरात राहते. घरात पती, दोन मुले व एक मुलगी आहे. त्यामुळे २२ जून रोजी शिवाजीनगर ठाण्यात तक्रार दिली असता केवळ अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला.

११ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता त्याने पुन्हा गाड्यावर येऊन मारहाण

दरम्यान,  सदर महिलेने २२ जून रोजी शिवाजीनगर ठाण्यात तक्रार दिली असता सदर व्यक्तीवर अदखलपात्र गुन्हा नोंदवून देखील ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता त्याने पुन्हा गाड्यावर येऊन मारहाण करून लज्जास्पद भाष्य केले. यावेळी पतीने त्याच्या तावडीतून सोडवले. त्यामुळे, सदर पिडीतेच्या पतीने पुन्हा पोलीस ठाणे गाठले आणि त्याच्याविरुद्ध पुन्हा तक्रार दिली असता शिवाजीनगर पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा नोंदविला आहे. त्यामुळे विनयभंगाचा गुन्हा नोंदवून त्यास जेरबंद करावे, अन्यथा २० सप्टेंबर रोजी आत्मदहन करण्याचा इशारा पीडित महिलेने दिला आहे. 

तू कोठेही जा तुला आणि तुझ्या पतीला सोडणार नाही

पीडितेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तू कोठेही जा तुला व तुझ्या पतीला सोडणार नाही, असे म्हणत जिवे मारण्याची धमकी सीताराम बडे दिली आहे. दरम्यान, सीताराम बडे याने माझे कोणी काहीच करू शकत नाहीत,  असं देखील म्हटलं असल्याचं पिडीतेने निवेदनात म्हटले आह. तरी कुटुंबास न्याय द्या, अन्यथा जीवन संपविण्याची परवानगी द्या, असे त्यात नमूद केले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी