हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्याने साजरा केला घोडीचा वाढदिवस, तब्बल ७०० पाहुण्यांच्या करण्यात आली होती जेवणाची सोय, त्याचाबरोबर......

A mare birthday was celebrated by a farmer in Hingoli district : सदर घोडीचे नाव वैष्णवी असं आहे. वैष्णवीच्या वाढदिवसाचे बॅनर देखील लावण्यात आले होते. वैष्णवीच्या वाढदिवसाला सोलापूर जिल्ह्यातील त्यांचे मित्र मंडळ वैष्णवीच्या वाढदिवसाला आले होते. तर, व गोडधोड जेवणाचा कार्यक्रम देखील ठेवण्यात आला होता. त्याचबरोबर,वाढदिवसानिमित्ताने जवळपास ६०० ते ७०० पाहुण्यांना बोलावण्यात आले होते

A mare birthday was celebrated by a farmer in Hingoli district
हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्याने साजरा केला घोडीचा वाढदिवस  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • शेतकऱ्याने चक्क आपल्या घोडीचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला
  • वाढदिवसानिमित्ताने जवळपास ६०० ते ७०० पाहुण्यांना बोलावण्यात आले होते
  • बेंगाळ यांच्याकडे सुप्रसिद्ध बादशहा आणि अर्जुन या नावाची बैल जोडीही आहे 

हिंगोली : लहान असो की मोठा सध्या प्रत्येकाचा वाढदिवस साजरा करण्याचा ट्रेंड सर्वत्र पहायला मिळत आहे. मात्र, हिंगोली जिल्ह्यात एक आगळा वेगळा वाढदिवस साजरा झाला आहे. एका शेतकऱ्याने चक्क आपल्या घोडीचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला आहे. त्यामुळे या वाढदिवसाची चर्चा जिल्ह्याभरात होत आहे. शेतकरी अक्षय राजेश बेंगाळ यांनी आपल्या लाडक्या घोडीचा वाढदिवस उत्साहात साजरा केला आहे. मिळालेय माहितीनुसार, हिंगोली येथून जवळच असलेल्या वरूड गवळी येथील शेतकरी अक्षय राजेश बेंगाळ यांना अश्व पाळण्याचा चांगलाच छंद आहे. त्यामुळे, अक्षय राजेश बेंगाळ १ जुलै रोजी आपल्या वैष्णवी नावाच्या घोडीचा सहावा वाढदिवस साजरा केला आहे. या वाढदिवसाला बाहेर जिल्ह्यातील अश्वप्रेमी देखिल उपस्थितीत होते.

अधिक वाचा : वजन कमी करण्यासाठी खाण्यापिण्यात करा हे बदल आणि पहा फरक

वाढदिवसानिमित्ताने जवळपास ६०० ते ७०० पाहुण्यांना बोलावण्यात आले होते

सदर घोडीचे नाव वैष्णवी असं आहे. वैष्णवीच्या वाढदिवसाचे बॅनर देखील लावण्यात आले होते. वैष्णवीच्या वाढदिवसाला सोलापूर जिल्ह्यातील त्यांचे मित्र मंडळ वैष्णवीच्या वाढदिवसाला आले होते. तर, व गोडधोड जेवणाचा कार्यक्रम देखील ठेवण्यात आला होता. त्याचबरोबर,वाढदिवसानिमित्ताने जवळपास ६०० ते ७०० पाहुण्यांना बोलावण्यात आले होते या अनोख्या वाढदिवसाची चर्चा मात्र जिल्हाभरात होत आहे. वैष्णवी हिची किंमत तब्बल ५ लाख रुपये आहे. ह्या घोडीची लग्नाची सुपारी ते ११ हजार घेतात.

अधिक वाचा : अमरावतीतील उमेश कोल्हे हत्या प्रकरणाचा तपास एनआयएकडे

बेंगाळ हे १९९८ पासून अश्वप्रेमी आहेत.

दरम्यान, बेंगाळ त्यांच्याकडे आता चार घोड्या आहेत. दुसरी घोडी सोनी नावाची आहे. तिची किंमत ४ लाख आहे. तिची सुपारी ते ९ हजार रूपये एवढी घेतात. त्यानंतर त्यांच्याकडे आर्ची आणि राधा नावाचे दोन घोड्या आहेत. त्यांची सुपारी ते ७ हजार ते ५ हजार घेतात तब्बल १४ लाख रुपये देऊन त्यांनी ह्या चार घोड्या खरेदी केल्या आहेत. या घोड्या एका वर्षाला त्यांना सुमारे १० लाख रुपये कमवून देतात आणि त्यांच्या चारा, पाण्यासाठी ते तब्बल ३ ते ४ लाख रुपये खर्च करतात. अशी माहिती बेंगाळ यांनी दिली आहे.

अधिक वाचा : स्कूल बस चालकाने नववीत शिकणाऱ्या मुलीवर केला बलात्कार 

बेंगाळ यांच्याकडे सुप्रसिद्ध बादशहा आणि अर्जुन या नावाची बैल जोडीही आहे 

दरम्यान, त्यांच्या कडे सुप्रसिद्ध बादशहा आणि अर्जुन या नावाची बैल जोडी देखील आहे. चालू काळात या जोडीने हिंगोली जिल्ह्यात धुमाकूळ घातला होता. अर्जुन आणि बादशहाचा चाहता वर्ग देखील भरपूर आहे. त्याचबरोबर बेंगाळ यांच्याकडे २० एकर शेती असून ते दोन भाऊ आहेत. ते बैलगाडा शर्यत पण खेळतात

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी