मुंडे भाऊ बहिणीचे मनोमिलन चर्चेंनंतर एका राजकीय षडयंत्राची बीडमध्ये चर्चा 

महाराष्ट्राच्या  राजकारणात  एकानंतर एक सूचक घडामोडी घडत असतानाच मराठवाड्यात सर्वांचं लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची घटना घडली भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर GST विभागाचा छापा मारण्यात आला,

A political conspiracy is discussed in Beed after Munde brother and sister reconciliation talks
मुंडे भाऊ बहिणीचे मनोमिलन? राजकीय षडयंत्राची बीडमध्ये चर्चा 
थोडं पण कामाचं
  • मुंडे बहीण भावात मनोमिलन झाले; दोघे एकत्र येणारे का? चर्चा सुरू ...
  • अन लागलीच वैद्यनाथ साखर कारखान्यावर GST विभागाचा छापा!
  • राजकीय षडयंत्र तर नाही ना? राज्यात चर्चेला उधाण!

सुकेशनी नाईकवाडे(बीड):- महाराष्ट्राच्या  राजकारणात  एकानंतर एक सूचक घडामोडी घडत असतानाच मराठवाड्यात सर्वांचं लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची घटना घडली भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर GST विभागाचा छापा मारण्यात आला, एक वर्षापासून बंद पडलेल्या साखर कारखान्याचा आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरु असल्याचे सांगण्यात ही आले. (A political conspiracy is discussed in Beed after Munde brother and sister reconciliation talks)

मात्र कारखान्याच्या संचालक पंकजा मुंडे यांना याची माहिती माध्यमाप्रमाणेच मिळाली असल्याचे खुद्द पंकजा मुंडे यांनी सांगितले तर त्यांनी बोलताना या बाबत आश्चर्य ही व्यक्त केले.

munde

मुंडे बहीण भावात राजकीय वैर हे उभ्या महाराष्ट्रने पाहिलं आहे  दोघे कार्यक्रमा निमित्त एकत्र आले की एकमेकांवर टीका  करण्यास कधीच मागे ही राहिले नाही मात्र नुकत्याच पार पडलेल्या नारळी पौर्णिमा निमित्त मुंडे बहीण भावात मनोनीलन झाल्याचे पाहवयास मिळाले ते दोघे एकत्र येणार का? अशा चर्चा सुरू असतानाच पंकजा मुंडे यांच्य साखर करखाण्यावर केंद्रीय GST विभागाची छापमारी या घटनेला आता राजकीय षडयंत्र तर नाही ना ? म्हणून बीड जिल्ह्यासह राज्याभरात चर्चा होताना दिसून येत आहेत. 

येणारा काळ मात्र या घटनेवरचा परदा उठवणार का? या प्रश्नाकडे मात्र सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी