क्षुल्लक वादातून बीडमध्ये भर चौकात गँगवार, घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्हीमध्ये कैद

A sharp increase in the incidence of crime in Beed : युवकांनी एकमेकांवर केलेल्या हल्ल्यात अनेकजण जखमी झाले आहेत. त्याचबरोबर, धारदार शास्त्राने देखील हल्ला करण्यात आल्याने कुणाल ढोले हा युवक गंभीर जखमी झाला आहे. सदर व्हिडीओमध्ये कुणाल ढोले या तरूणावर ८ तरुणांनी हल्ला केला असल्याचं दिसून येत आहे. यामध्ये ढोले हा गंभीर जखमी झाला असल्याची माहिती मिळाली आहे.

A sharp increase in the incidence of crime in Beed
शुल्लक वादातून बीडमध्ये भर चौकात गँगवार, पहा सीसीटीव्ही  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • बीड शहरातील तुळजाई चौकात भर रस्त्यात घडली गँगवार
  • ८ जणांकडून एका युवकाला जबर मारहाण
  • मारहाणीत युवक गंभीर जखमी

बीड : गेल्या काही दिवसांपासून बीड शहरात हत्येच्या घटनेत मोठी वाढ होताना दिसत आहे. तसेच गँगवारच्या घटना देखील बीडमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचं पहायला मिळत आहेत. दरम्यान, अशीच एक गँगवारची घटना बीड शहरातील तुळजाई चौकात भर रस्त्यात घडली आहे. सदर घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सदर घटना ही ३ दिवसांपूर्वीची असून, सोशल मिडियावरती सदर व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या घटनेत युवकांनी एकमेकांवर केलेल्या हल्ल्यात अनेकजण जखमी झाले आहेत. त्याचबरोबर, धारदार शास्त्राने देखील हल्ला करण्यात आल्याने कुणाल ढोले हा युवक गंभीर जखमी झाला आहे. सदर व्हिडीओमध्ये कुणाल ढोले या तरूणावर ८ तरुणांनी हल्ला केला असल्याचं दिसून येत आहे. यामध्ये ढोले हा गंभीर जखमी झाला असल्याची माहिती मिळाली आहे.

अधिक वाचा ; राखी बांधताना तीन गाठ मारणे का आहे गरजेचे? जाणून घ्या

तातडीने या गॅंगवॉरचां बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

बीड शहरात गेल्या काही दिवसांपूर्वीचं एका तरुनाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती. हे प्रकरण ताजे असतानाच शुल्लक कारणावरून एकमेकांना भिडणारे युवकांमध्ये धारदार शस्त्राने गँगवार करू लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या गँगवार मुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच कायदा सूव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून पोलिसांचा धाक उरला आहे का? नाही असा सवाल सामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. तसेच तातडीने या गॅंगवॉरचां बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

अधिक वाचा : फुकटात देण्याचे राजकारण अर्थव्यवस्थेसाठी धोक्याचे 

दुसरी घटना : मुलीला केलेल्या छेडछाडीचा जाब विचारणाऱ्या महिलेचा खून

मिळालेय माहितीनुसार, परळी तालुक्यातील मौजे वानटाकळी तांडा येथे सदर हत्येची घटना घडली आहे. पिडीत मुलीचे आई अनिता राठोड आणि वडील वैजनाथ राठोड हे बालाजी येथे दर्शनासाठी गेले होते. यावेळी अनिता आणि वैजनाथ यांच्या ३ मुली या घरीच होत्या. यादरम्यान, तांडा येथेच राहणाऱ्या मुलीना त्रास देण्यास सुरुवात केली होती. दरम्यान, सुरु असलेल्या त्रासाला मुली कंटाळल्या होत्या. मुलीनी आई आणि वडील हे परत आल्यानंतर बबनने दिलेला त्रास आपल्या आई-वडिलांना सांगितला. यानंतर मुलीचे आई आणि वडील यांनी दोन दिवसापूर्वी बबन चव्हाण मुलीना का त्रास दिला असं विचारले. यानंतर बबन चव्हाण आणि मुलीच्या आई आणि वडिलांमध्ये भांडण झाले. आणि याचाच राग मनात धरून काल मंगळवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास बबन चव्हाण त्याचे वडील राजेभाऊ चव्हाण भाऊ सचिन चव्हाण यासह इतर तिघांनी राठोड कुटुंबियांच्या घरी जाऊन भांडण देखील केले.

अधिक वाचा ; वजन कमी करण्यासाठी रामबाण उपाय आहे कांदा, जाणून घ्या फायदे

असा केला आरोपींनी अनिता राठोड यांचा खून?

दरम्यान, चव्हाण आणि राठोड कुटुंबाचा सुरुवातीचा वादाचे रुपनात्र मोठ्या भांडणात झाले. वैजनाथ राठोड यांना काही लोकांनी मारहाण होऊ नये म्हणून रूममध्ये कोंडून दरवाजा लावून घेतला. यावेळी, चव्हाण कुटुंबातील लोकांनी दुसर्‍या रूममध्ये असलेल्या अनिता राठोड यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. आणि अनिता राठोड यांच्या पोटात तीक्ष्ण हत्यारांनी वार करून व डोक्यात लाकडाने मारहाण करून गंभीर जखमी केले होते. यानंतर नागरिकांनी गंभीर अवस्थेत अनिता राठोड यांना उपचारासाठी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी