आत्महत्या करण्यापूर्वी युवकाने लिहिली धक्कादायक सुसाईड नोट, म्हणाला 'भावांनो माझा दहावा घालू नका'

A shocking suicide note written by a young man before his suicide : आत्महत्येपूर्वी नैनेशने एक भावांना चिठ्ठी लिहिली आहे. यामध्ये भावांनो घाबरू नका, मला दवाखान्यात नेण्याची गडबड करू नका. मम्मी पप्पाजवळच थांबा. आता माझा खेळ संपला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पत्नी व मुलांना सांभाळा, अशा आशयाची चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्याचबरोबर, 'भावांनो, स्वतःची व मम्मी-पप्पाची काळजी घ्या. माझा मृतदेह घरी नेऊ नका. असं त्याने लिहिले आहे.

A shocking suicide note written by a young man before his suicide
आत्महत्या करण्यापूर्वी लिहिली धक्कादायक सुसाईड नोट  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मुकुंदवाडी भागातील स्वराजनगरात एका ३३ वर्षीय युवकाने केली आत्महत्या
  • नैनेश पांडुरंग शिरसाठ असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे
  • नैनेशने आत्महत्या का केली याचा पोलिस करतायेत तपास

औरंगाबाद : मुकुंदवाडी भागातील स्वराजनगरात एका ३३ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नैनेश पांडुरंग शिरसाठ असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. नैनेश शिरसाठ हा औरंगाबाद येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करत होता. . नैनेश शिरसाठने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. रविवारी साडेदहाच्या सुमारास मुकुंदवाडी भागातील स्वराजनगरात ही घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, नैनेशने आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट देखील लिहून ठेवली आहे. या सुसाईड नोटमध्ये नैनेशने 'माझा दहावा व इतर कुठलाही विधी करू नका' असं त्याच्या कुटुंबातील सदस्यांना आणि मित्रांना उद्देशून म्हटलं असल्याची माहिती मिळाली आहे. नैनेशने दोन महिन्यांपूर्वी काम करत असलेल्या पंचतारांकित हॉटेलमधील नौकरी देखील सोडली होती.

अधिक वाचा : पहिल्या सामन्यात ठरला फेल, तरी T-20 मध्ये रोहित आहे अव्वल

नेमकं काय लिहिले आहे नैनेशने सुसाईड नोटमध्ये?

आत्महत्येपूर्वी नैनेशने एक भावांना चिठ्ठी लिहिली आहे. यामध्ये भावांनो घाबरू नका, मला दवाखान्यात नेण्याची गडबड करू नका. मम्मी पप्पाजवळच थांबा. आता माझा खेळ संपला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पत्नी व मुलांना सांभाळा, अशा आशयाची चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्याचबरोबर, 'भावांनो, स्वतःची व मम्मी-पप्पाची काळजी घ्या. माझा मृतदेह घरी नेऊ नका. घाटीत शवविच्छेदन करण्यासाठी न्या. माझा दहावा व इतर कुठलाही विधी करू नका. अंत्यसंस्कार करून थेट लेणीवर राख फेका, हात जोडून विनंती असल्याच नैनेशने सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवले आहे.

अधिक वाचा ; या बायकांपासून दूर राहण्यास सांगताय चाणक्य, जाणून घ्या कारण 

नैनेशने आत्महत्या का केली याचा पोलिस करतायेत तपास

नैनेशने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना कळवण्यात आली होती. यानंतर मुकुंदवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून, नैनेशचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. नैनेशाच्या पश्चात तीन भाऊ, आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, असा परिवार आहे. नैनेशने आत्महत्या का केली याचा तपास पोलिस करीत आहेत.

अधिक वाचा ; वजन कमी करताना चुकूनही Breakfast ला खाऊ नका 'या' गोष्टी

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी