राक्षसासारखी काळी तोंडे करून माकडउड्या मारणारे कोरोनापेक्षा मोठे पाताळयंत्री! रूपाली चाकणकरांची भाजपावर टीका

औरंगाबाद
अजहर शेख
Updated May 22, 2020 | 15:13 IST

संपूर्ण महाराष्ट्र कोविड-१९ युद्धात रणांगणात उतरला असताना राक्षसासारखी काळी तोंडे करून अंगणात माकडउड्या मारणारे मला कोरोना विषाणूपेक्षा मोठे पाताळयंत्री वाटतात- रूपाली चाकणकर

A submarine bigger than a corona that kills monkeys with black mouths like Subterranean !
राक्षसासारखी काळी तोंडे करून माकडउड्या मारणारे कोरोनापेक्षा मोठे पाताळयंत्री! रूपाली चाकणकरांची भाजपावर टीका  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज संपूर्ण राज्यात ‘महाराष्ट्र बचाओ’ च्या नावाखाली आंदोलन सुरू
  • राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी देखील भाजपला फटकारले आहे.
  • प्रभावी पाऊले टाकण्याची गरज होती, ती टाकलेली दिसत नाही-देवेंद्र फडणवीस

पुणे: भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज संपूर्ण राज्यात ‘महाराष्ट्र बचाओ’ च्या नावाखाली  आंदोलन सुरू केले आहे.  कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात हे राज्य सरकार अपयशी ठरलं असून या सरकारला आता जाग आणण्याची वेळ आली आहे. त्यामुळे जनतेने आपल्या घराच्या अंगणात उभं राहून सरकारच्या निष्क्रीयते विरोधात काळे झेंडे, कोणत्याही काळ्या वस्त्राने निषेध व्यक्त करावा, असे भाजपकडून आवाहन करण्यात आले आहे. मात्र भाजपाने केलेल्या आवाहनाला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी खरमरीत उत्तर दिले आहे.

काय म्हणाल्या रूपाली चाकणकर

संपूर्ण महाराष्ट्र कोविड-१९ युद्धात रणांगणात उतरला असताना राक्षसासारखी काळी तोंडे करून अंगणात माकडउड्या मारणारे मला कोरोना विषाणूपेक्षा मोठे पाताळयंत्री वाटतात, अशा जहाल शब्दात रुपाली चाकणकर यांनी भाजपच्या आंदोलनावर टीका केली आहे.

भाजपाच्या या आंदोलनावर धनंजय मुंडे यांनीही ट्विटरच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीवर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले धनंजय मुंडे

तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी देखील भाजपला फटकारले आहे. महाराष्ट्र कोरोनाच्या संकटाला मोठ्या धीराने सामोरे जात असताना, मातीशी इमान न राखणारे काहीजणं आंदोलन करत आहेत. राज्य कोरोनामुक्त करण्यासाठी आपले प्राण पणाला लावणाऱ्या सर्वांचाच हा अपमान आहे. मातीशी केलेली गद्दारी महाराष्ट्र कधीच विसरणार नाही, असे मुंडे म्हणाले आहेत.

प्रभावी पाऊले टाकण्याची गरज होती, ती टाकलेली दिसत नाही - देवेंद्र फडणवीस

दरम्यान माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना एक निवेदन आज देण्यात आले. कोरोनाचे संकट हाताळणीत राज्य सरकार सपशेल अपयशी ठरले आहे, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी सरकार चांगलेच तोंडसुख घेतले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी सरकार केली टीका काय म्हणाले फडणवीस

कोरोनामुळे जे संकट उभे ठाकले आहे, त्याचा सामना करण्यासाठी जी प्रभावी पाऊले टाकण्याची गरज होती, ती टाकलेली दिसत नाही. त्यामुळेच आज देशातील सर्वाधिक कोरोना रूग्ण आणि सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात दिसून येतात आणि ही संख्या दररोज वाढतच आहे. विशेषत: मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, मालेगाव या शहरांमध्ये प्रादुर्भाव अतिशय वेगाने वाढतो आहे. अनेक लोकांना उपचार मिळत नाहीत. कोणत्या रूग्णालयात किती खाटा शिल्लक आहेत, याची कुठलीही माहिती दिली जात नाही.शेतकर्‍यांची अवस्था दिवसेंदिवस वाईट होत आहे. शेतमाल खरेदीसाठी कोणतीही यंत्रणा उभारण्यात आलेली नाही. त्यांचा माल घरी पडून आहे. बारा बलुतेदारांवर सुद्धा संकट आहे. केंद्र सरकारने पॅकेज जाहीर केले. विविध राज्यांनी सुद्धा अनेक राज्यांसाठी पॅकेज जाहीर केले. पण, महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात एकही पॅकेज जाहीर होऊ नये, हे गंभीर आहे.

 

पवारांनी अनेकदा पंतप्रधानांना पत्र लिहिली, त्यांनी मुख्यमंत्र्यांना एकदा पत्र लिहिले पाहिजे- फडणवीस

दरम्यान फडणवीस यांनीही टीका करताना शरद पवारांवर देखील तोंडसुख घेतले होते. शरद पवार यांनी पंतप्रधानांना अनेकदा पत्र लिहिली, त्यांनी एकदा मुख्यमंत्र्यांनाही पत्र लिहिले पाहिजे. स्थलांतरित कामगारांचे सुद्धा महाराष्ट्रात प्रचंड हाल झाले. केंद्र सरकारने रेल्वे उपलब्ध करून दिल्या. केंद्राने त्याचे 85 टक्के पैसे दिले आणि राज्यांना केवळ 15 टक्के द्यायचे होते. मात्र महाराष्ट्रातील अज्ञानी मंत्र्यांना रेल्वेसाठी किती खर्च येतो, हेच माहिती नाही. असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी