महाराष्ट्रात 25 लाख युवा वॉरियर्सची टीम उभी करणार, राहुल लोणीकर यांचं मोठ वक्तव्य

औरंगाबाद
Updated Nov 23, 2022 | 19:51 IST | टाइम्स नाऊ मराठी

A team of 25 lakh youth warriors will be formed in Maharashtra - Lonikar ; भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातुन महाराष्ट्रात 25 लाख युवा वॉरियर्सची टीम उभी करत तरुण पिढीला भाजपच्या ( BJP ) प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे वक्तव्य युवा मोर्चाचे नुतन प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी केलं आहे.

A team of 25 lakh youth warriors will be formed in Maharashtra - Lonikar
महाराष्ट्रात 25 लाख युवा वॉरियर्सची टीम उभी करणार - लोणीकर  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • युवा मोर्चाच्या माध्यमातुन महाराष्ट्रात 25 लाख युवा वॉरियर्सची टीम उभी करणार - राहुल लोणीकर
  • तरुण पिढीला भाजपच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणार - राहुल लोणीकर
  • जिल्हयामध्ये आणखीण ताकदीने काम करेल - युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर

उस्मानाबाद : भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातुन महाराष्ट्रात 25 लाख युवा वॉरियर्सची टीम उभी करत तरुण पिढीला भाजपच्या ( BJP ) प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे वक्तव्य युवा मोर्चाचे नुतन प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर ( Rahul Lonikar ) यांनी केलं आहे. राहुल लोणीकर आज उस्मानाबाद जिल्ह्याच्या ( Osmanabad District  ) दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी सहकुटुंब तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. त्यानंतर युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांशी संवाद साधुन भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातुन महाराष्ट्रात 25 लाख युवा वॉरियर्सची टीम उभी करत तरुण पिढीला भाजपच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं म्हटलं आहे.

त्याचबरोबर येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थां व नगरपालिका निवडणुकांमध्ये युवकांना मोठया प्रमाणात संधी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असुन युवकांनीही आपली सर्व ताकद राष्ट्रकार्यासाठी समर्पीत करण्याची गरज असल्याचं देखील राहुल लोणीकर यांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा ; "40 गाव सोडा... महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाणार नाही

जिल्ह्यामध्ये आणखीण ताकदीने काम करेल - युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर

दरम्यान, भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांनी बैठकीमध्ये नुतन प्रदेशाध्यक्ष लोणीकर यांना आश्वाशित केले की, येणाऱ्या काळात भारतीय जनता युवा मोर्चा उस्मानाबाद जिल्हयामध्ये आणखीण ताकदीने काम करेन. आणि भारतीय जनता पार्टीचे कार्य तळागळा पर्यंत पहोचविण्याचे कार्य करणार असल्याचं देखील राजसिंह राजेनिंबाळकर यांनी म्हटलं.

तसेच युवा वॉरियर्सच्या माध्यमातून आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकुर, यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा भरात 18 ते 25 वयोगट असणाऱ्या युवकांची मोठी फळी तयार करुन शाखा उघडणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर युवती आघाडी यांची देखील मजबूत फळी निर्माण करण्याचे उद्दीष्ट यावेळी जाहीर केले. तसेच कार्यकर्त्यांना युवा मोर्चा हा भाजपामध्ये मुख्यपदावर कार्य करण्याची संधी मिळवून देणारे व्यासपीठ असल्याचं देखील राजसिंह राजेनिंबाळकर यांनी म्हटलं आहे.

 

अधिक वाचा ; कोहलीने घातला इतका महागडा टीशर्ट, किंमत ऐकून व्हाल हैराण

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी