MLA Santosh Bangar : औरंगाबाद : दोन दिवसांपूर्वी हिंगोली जिल्ह्यतील कळमनुरी मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांनी गद्दार म्हणणाऱ्याच्या कानाखाली जाळ काढा असं वक्तव्य केलं होत. उद्धव ठाकरे यांनी हिंगोली जिल्हाध्यक्ष पदावरुन संतोष बांगर यांची हकालपट्टी केल्यानंतर शिंदे गटाचे शिवसेना आमदार संतोष बांगर चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहेत. मुंबईत शक्तीप्रदर्शन केल्यानंतर बांगर यांनी आज हिंगोलीत शिवसेनिकांशी सवांद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले आहेत की, ''गद्दार म्हणणाऱ्यांच्या कानाखाली आवाज काढा.'' असं वक्तव्य केलं होत. दरम्यान, संतोष बांगर यांना आता शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते फोन करून, या वक्तव्याच जाब विचारत असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, या सर्व घडामोडीत एक फोन रेकॉर्डिंग चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे. या फोन समोरचा व्यक्ती आमदार संतोष बांगर यांना त्यांचा मतदार असल्याचं बोलत आहे. त्याचबरोबर तुम्हाला ५० कोटी रुपये मिळाले असून, मला ५० लाखाची गरज असल्याचे बोलत आहे.
अधिक वाचा ; पुण्यात शाळेच्या बस चालकाकडून दलित अल्पवयीन मुलीवर बलात्कार
एक अनोळखी व्यक्ती आमदार संतोष बांगर यांना फोन करतो. तो फोन संतोष बांगर यांच्याशी संबंधित व्यक्ती घेतो, तेव्हा समोरचा व्यक्ती आमदार बांगर यांच्याशी मला बोलायचं आहे असं म्हणतो. त्यानंतर आमदार बांगर हे फोन घेतात. तेव्हा तो व्यक्ती भाऊ वेरड बोलत असल्याचं बांगर यांना सांगतो. त्यावेळी तो व्यक्ती म्हणतो की, मी कळमनुरी येथील आहे, मात्र सध्या अहमदनगर येथे सर्विसला आहे. आपले अभिनंदन करायचे होते. तुम्ही जाता जाता नगरला थांबून सत्कार घेतला असता, यावेळी आमदार म्हणतात की, मी हिंगोली येथे पोहोचलो आहे. त्यानंतर तो व्यक्ती बांगर यांना म्हणतो की, मला सध्या ५० लाखाची गरज आहे. ‘तुम्हाला सध्या ५० कोटी रुपये मिळाले आहेत’ मला थोडी अडचण होती मी सहा महिन्यात तुमचे पैसे परत करीन, हे ऐकून आमदार देखील ५० लाख रुपये द्यायला तयार होतात. यानंतर तो व्यक्ती पैसे घ्यायला कधी येऊ असं विचारतो, यावेळी आमदार उद्या या असं त्या व्यक्तीला बोलतात.
अधिक वाचा : मालदीवमध्ये 'जन गण मन'चे सूर, पहिल्याच दिवशी चार सुवर्ण पदक
दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संतोष बांगर यांची हिंगोली जिल्हाध्यक्ष पदावरुन हकालपट्टी केली होती. यावर आपली प्रतिक्रिया देताना बांगर म्हणाले होते की, मला कोणीही जिल्हाध्यक्ष पदावरून हटवू शकत नाही. यानंतर बांगर यांनी एकनाथ शिंदे यांच्या सह्याद्री ग्सेट हाऊस बाहेर शेकडो कार्यकर्त्यांसह शक्तीप्रदर्शन केले. यांच्यासह समर्थकांनी हमारा नेता कैसा हो एकनाथ भाई जैसा हो, अशी घोषणाबाजी केली होती.
अधिक वाचा : भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्यावर गुन्हा