उस्मानाबाद : जुन्या मित्राला जेवायला उशिरा का बोलवलं म्हणून एका महिलेची हत्या केल्याची धक्कादायक घटना उस्मानाबाद तालुक्यातील चिखली या गावात घडली आहे. पोलिसांनी महिलेच्या हत्या प्रकरणात एका संशयित आरोपीला पकडले होते. या संशयित आरोपीची पोलिसांनी कसून चौकशी केल्यास त्याने आपण केलेला गुन्हा कबूल केला आहे. न्यायालयाने या आरोपीला सात दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. बेंबळी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक मच्छींद्र शेंडगे यांनी ही माहिती दिली आहे.
अधिक वाचा : या 1 रुपयाच्या शेअरने बनवले करोडपती, 1 लाखाचे झाले 7.32 कोटी
पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयत महिलेचे नाव कविता व्यंकट देशमुख असं आहे. कविता देशमुखचा खून हा क्षुल्लक कारणामुळे झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी महिलेच्या खुनाचा छडा अवघ्या काही तासातच लावला आहे. जुन्या मित्राला जेवायला उशिरा का बोलवलं या कारणावरुन कविताचा खून केल्याची कबूली आरोपीने दिली आहे. महिलेची हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव संतोष परमेश्वर हिप्परगे असं आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील चिखली पाटी येथे बंद असलेल्या हॉटेलात सदर महिलेचा मृतदेह आढळून आला होता. आरोपीने महिलेची हत्या करून बाहेरून कुलूप लावून पळ काढल्याची देखील माहिती मिळाली आहे. रविवारी म्हणजेच २१ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास बंद हॉटेलचे शटर उघडल्यानंतर महिलेचा मृतदेह मृत अवस्थेत आढळला होता. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने महिलेचा खून झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता.
अधिक वाचा : आजचे राशीभविष्य; जाणून घ्या आजचा बुधवार तुमच्यासाठी कसा
दरम्यान, सदर महिला ही हॉटेलचा व्यवसाय करत होती. तिने १ महिन्यापूर्वी अनिल सुर्यकांत गोडसे यांच्या गट क्र. ७५ मधील शेतातील रस्त्याच्याकडेची जागा भाड्याने घेऊन हॉटेल सुरू केले होते. हॉटेल दिवसभर बंद असल्याने सदर शेतकऱ्याला संशय आला आणि त्याने स्वतः बेंबळी पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना घटनेची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी हॉटेलचे शटर उघडले असताच आत महिलेचा मृतदेह आढळून आला. तसेच हॉटेलमध्ये दारुच्या रिकाम्या बाटल्या व रिकामे बॉक्स देखील आढळून आले होते.
अधिक वाचा : कोणत्या दिवशी कोणती वस्तू खरेदी करणं ठरेल शुभ आणि अशुभ