'everything will be ok' असं स्टेटस ठेवत तरुणाने केली आत्महत्या

A young man committed suicide by keeping a status on WhatsApp ; सैन्यात भरती होण्याची इच्छा असलेल्या एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ओमकार नारायण डांगरे असं (वय 21 वर्षे,रा.सोनार गल्ली) आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.  

A young man committed suicide by keeping a status on WhatsApp
'everything will be ok' असं स्टेटस ठेवत तरुणाने केली आत्महत्या   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • स्टेटस ठेवत तरुणाने केली आत्महत्या
  • ओमकार नारायण डांगरे असं तरुणाचे नाव आहे
  • ओमकारला सैन्यात भारती होण्याची इच्छा होती

औरंगाबाद : सैन्यात भरती होण्याची इच्छा असलेल्या एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ओमकार नारायण डांगरे असं (वय 21 वर्षे,रा.सोनार गल्ली) आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.  ओमकारला सैन्यात भरती होण्याची खूप इच्छा होती. दरम्यान, तो रोज भरतीची तयारी करत होता. मात्र, त्याने आत्महत्या केल्याने त्याची इच्छा अपुरी राहिली आहे. ओमकारने व्हॉट्सअपवर स्टेट्स ठेवून विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली. ही घटना औरंगाबादमधील बिडकीन एमआयडीसीमध्ये घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

अधिक वाचा ; Red wine benefits: रेड वाईनचे असंख्य फायदे,त्वचा होईल मुलायम

मोबाईल नंबर वरुन ट्रॅक केले असता आत्महत्या केल्याचे झाले उघड

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोजच्या वेळेनुसार ओमकार घरी आला नाही. त्यामुळे त्याचे कुटुंबीय चिंतेत होते. दरम्यान, त्यांनी पोलीस ठाणे गाठलं आणि आपली तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली. पोलिसांनी सदर घटनेचा तात्काळ तपास सुरु केला. सहायक पोलिस निरीक्षक संतोष माने यांनी तांत्रिक विश्लेषण करत मोबाईल नंबर वरुन ट्रॅक केले असता मोबाईल नंबरचे लोकेशन डीएम आयसी औद्योगिक वसाहतीत मिळून येत असल्याचे दिसून आले. त्या ठिकाणी पोलीस आणि ओमकारचे कुटुंबीय पोहोचले असता, एका विहिरीजवळ ओमकारची गाडी आणि चप्पल दिसून आली. ओमकारची चप्पल विहिरीजवळ आढळून आल्यावर नेमकी काय घटना घडली आहे यांचे गांभीर्य सर्वांच्या लक्षात आले आणि मोठा आक्रोश सुरु झाला. पोलिसांनी अग्निशामक दलास पाचारण केले. अग्निशामक दलाच्या जवानांनी १ तासाचे अथक परिश्रम घेत मृतदेह विहिरीच्या बाहेर काढत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.

अधिक वाचा ; Ullu Appवर आहेत अशा काही वेबसिरीज ज्या एकट्यानेच पाहू शकतात 

मोबाईलवर स्टेटस ठेवत ओमकारने केली आत्महत्या

दरम्यान, ओमकारने आत्महत्या करण्यापूर्वी एक स्टेटस ठेवले होते. व्हॉट्सअपवरती ओमकारने  "I just feel like if I died everything will be ok:) " अशा प्रकारे स्टेटस ठेवत आपली जीवनयात्रा संपवली आहे. ओमकार डांगरे हा पोलीस व सैनिकी भरती तसंच शासकीय नोकरीची तयारी करत होता अशी माहिती मित्रांच्या वतीने देण्यात आली.

अधिक वाचा ; वार्षिक राशिभविष्य 2023 :सर्व12 राशींसाठी कसे असेल नवं वर्ष

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी