President Election 2022 : औरंगाबादच्या तरुणाने दिल्लीत जाऊन भरला राष्ट्रपतीपदाचा अर्ज, अर्जाची पावती होतेय प्रचंड व्हायरल

A young man from Aurangabad went to Delhi and filled the application : मिळालेल्या माहितीनुसार विशाल नांदरकरने आपण संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार अर्ज भरत असल्याची माहिती या तरुणाने समाजमाध्यमावर दिली होती. त्यानंतर त्याच्या सोशलमिडिया राष्ट्रपती निवडणूक अर्जाची पावती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. नांदरकर या तरुणाने चक्क दिल्लीतील राष्ट्रपती भवन येथे जाऊन राष्ट्रपती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला आहे.

A young man from Aurangabad went to Delhi and filled the application for the post of President
औरंगाबादच्या तरुणाने दिल्लीत जाऊन भरला राष्ट्रपतीपदाचा अर्ज  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • औरंगाबाद जिल्ह्यातील एका तरुणाने राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आपला अर्ज दाखल केला
  • विशाल उद्धव नांदरकर असं अर्ज दाखल करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
  • विशाल नांदरकर हा तरुण शहरातील सामाजिक कार्यकर्ता आहे.

President Election 2022 : औरंगाबाद : सध्या राष्ट्रपतीची निवडणूक लागली आहे. या निवडणुकीत मोजके लोकं उमेदवारी अर्ज दाखल करतात. मात्र, आता मराठवड्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील एका तरुणाने राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आपला अर्ज दाखल केला आहे. विशाल उद्धव नांदरकर असं या तरुणांचे नाव आहे. विशाल नांदरकर हा तरुण शहरातील सामाजिक कार्यकर्ता आहे. त्याला समाजकार्याची मोठी आवड आहे. विशाल नांदरकरने आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी थेट दिल्ली गाठली आणि उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे, विशाल नांदरकर हा तरुण आता चांगलाच चर्चेत आला आहे.

अधिक वाचा : पत्नी नताशाची जीन्स घालतो वरूण धवन, सांगितला अफलातून किस्सा

संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार अर्ज भरत असल्याची माहिती या तरुणाने समाजमाध्यमावर दिली

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार विशाल नांदरकरने आपण संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार अर्ज भरत असल्याची माहिती या तरुणाने समाजमाध्यमावर दिली होती. त्यानंतर त्याच्या सोशलमिडिया राष्ट्रपती निवडणूक अर्जाची पावती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. नांदरकर या तरुणाने चक्क दिल्लीतील राष्ट्रपती भवन येथे जाऊन राष्ट्रपती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला आहे. अनेक दिवसापासून विशाल नांदरकर या तरुणाची इच्छा राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्याची होती. त्यामुळेच त्याने जिद्दीने दिली गाठत आपल्या उमेदवारीचा अर्ज दाखल केला आहे.  

अधिक वाचा : पैसे मोजताना करू नका 'ही' चूक, नाहीतर होईल लक्ष्मी मातेचा को

विशाल नांदरकर औरंगाबाद शहरातील सिडको परिसरातील रहिवासी

मिळालेल्या माहितीनुसार विशाल नांदरकर हा तरुण औरंगाबाद शहरातील सिडको परिसरातील रहिवासी आहे. तो सामाजिक कामात सक्रीय असतो, शहरतील अनेक सामाजिक उपक्रमात तो भाग घेत असतो. त्याला आपण एकदा तरी राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवावी अशी इच्छा होती. त्यानंतर त्याने दिली येथे जात राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी अर्ज भरला. त्याच्या अर्जाची पावती आता सोशल मिडियामध्ये प्रचंड व्हायरल होत असून, अनेक जण त्याचे कौतुक देखील करत आहेत.

अधिक वाचा : राज्यावरील राजकीय संकट कधी दूर होणार?गडकरींनी केलं मोठ विधान

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी