हिंगोली जिल्ह्यात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणीला धमकी, पोलिसात गुन्हा दाखल

A young man living in a live-in relationship threatens a young woman ; सदर घटना ही हिंगोली जिल्ह्यातील डोंगरकडा याठिकाणी घडली आहे. तरुणीने ज्या तरुणावर गंभीर आरोप केले आहेत. त्याचे नाव साजिद पठाण असं आहे. साजिद आणि तरुणी ही गेल्या दोन महिन्यापासून शपथ पत्र तयार करून लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होते. गेल्या दोन महिन्यांपूर्वी संबंधित आरोपी साजिद पठाण यांनी संबंधित मुलीला फुस लावून पळवून नेले आणि वेगवेगळ्या ठिकाणी पीडित मुलीवर अत्याचार केला. असा आरोपी देखील तरुणीने केला आहे.

A young man living in a live-in relationship threatens a young woman
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणाची तरुणीला धमकी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका तरुणानं आपल्याच पार्टनरला धर्मांतर करण्यासाठी धमकी दिल्याचा आरोप
  • पीडित तरूणी आणि आरोपी दोन महिन्यापासून लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होते.
  • तरुणाने मुलीवर धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकला, तरुणीने दिली पोलिसात तक्रार

हिंगोली : देशात  श्रद्धा वालकरच्या  (Shraddha Walkar Murder case) हत्येची घटना ताजी असतानाच हिंगोलीत पुन्हा एक प्रकरण समोर आले आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका तरुणानं आपल्याच पार्टनरला धर्मांतर करण्यासाठी धमकी दिल्याचा आरोप एका तरुणीने केला आहे. धर्मांतर न केल्यास जीवे मारेन, अशी धमकी देखील आरोपीने दिल्याची तक्रार तरुणीने पोलिसात दिली आहे. तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून, पोलीस तरुणाची कसून चौकशी करत आहेत.  

अधिक वाचा ; Rip Twitter: मस्कला झालंय तर काय? शेअर केली ट्विटरची कबर

पीडित तरूणी आणि आरोपी लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होते.

मिळालेल्या माहितीनुसार. सदर घटना ही हिंगोली जिल्ह्यातील डोंगरकडा याठिकाणी घडली आहे. तरुणीने ज्या तरुणावर गंभीर आरोप केले आहेत. त्याचे नाव साजिद पठाण असं आहे. साजिद आणि तरुणी ही गेल्या दोन महिन्यापासून शपथ पत्र तयार करून लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होते. गेल्या दोन महिन्यांपूर्वी संबंधित आरोपी साजिद पठाण यांनी संबंधित मुलीला फुस लावून पळवून नेले आणि वेगवेगळ्या ठिकाणी पीडित मुलीवर अत्याचार केला. असा आरोपी देखील तरुणीने केला आहे. अत्याचारानंतर  लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा  शपथ पत्रावर करार केला. करारानंतर हे  पुढे हे कपल दोन महिने लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिले असंही पिडीतेने म्हटलं आहे.

अधिक वाचा ; जंगलात मिळाली हाडे, श्रद्धा केसची रहस्य उलगडण्याची शक्यता 

तरुणाने मुलीवर धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकला

त्यानंतर आरोपी तरुणाने मुलीवर धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकला. असंही पिडीतेने म्हटलं आहे. त्यानंतर पिडीता ही मोठ्या प्रमाणात घाबरली आणि तिने थेट पोलीस ठाणे गाठून आखाडा बाळापूर पोलिसात तक्रार  केली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला ताब्यात घेतले आहे.

अधिक वाचा ; रात्रीची लाईट, अन् पिकाला पाणी देण्यासाठी गेला, झाला मृत्यू

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी