घरातून निघालेली तरुणी परतलीच नाही, नंतर जे घडलं ते....

औरंगाबाद
Updated Jul 26, 2022 | 16:34 IST | टाइम्स नाऊ मराठी

A young woman died tragically in Palam city : फिट्स आल्यामुळे धृपताचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. कारण, अनेक वर्षांपासून फिट्स् येण्याच्या आजारामुळे त्रस्त होती अशी माहिती तिच्या कुटुंबातील सदस्यांनी दिली आहे. सदर घटने प्रकरणी पालम पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद देखील करण्यात आली आहे. दरम्यान, धृपताच्या मृत्यूचे आणखी काही कारण आहे का? यांचा देखोल पालम पोलीस तपास करत आहे.

A young woman died tragically in Palam city
घरातून निघालेली तरुणी परतलीचं नाही, नंतर जे घडलं ते.....  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • २४ जुलै रोजी एक तरुणी घराबाहेर पडली मात्र ती घरी परतलीच नाही
  • दुसऱ्या दिवशी तरुणीचा मृतदेह पाण्यात आढळून आला
  • सदर तरुणी प्लास्टिक बाटल्या, भंगार वेचण्याचे काम करत होत्या

परभणी : परभणीतील एक तरुणी २४ जुलै रोजी घराबाहेर पडली मात्र ती घरी परतलीच नाही. दुसऱ्या दिवशी थेट तिचा मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना समोर आली. सदर तरुणीचे नाव धृपता गंगाराम गंटलवाड असं आहे. सदर घटना परभणी जिल्ह्याच्या पालम या शहरात घडली असून, घरातून बाहेर गेलेल्या तरुणीचा दुसऱ्या दिवशीचं तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धृपताला फिट्स येऊन ती नालीच्या पाण्यात पडून तिचा मृत्यू झाला आहे.

अधिक वाचा ; आम्ही एकत्र आल्याने कोणीही शिरकाव करू शकत नाही - दानवे

धृपता फिट्स् येण्याच्या आजारामुळे त्रस्त होती

फिट्स आल्यामुळे धृपताचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. कारण, अनेक वर्षांपासून फिट्स् येण्याच्या आजारामुळे त्रस्त होती अशी माहिती तिच्या कुटुंबातील सदस्यांनी दिली आहे. सदर घटनेप्रकरणी पालम पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद देखील करण्यात आली आहे. दरम्यान, धृपताच्या मृत्यूचे आणखी काही कारण आहे का? यांचा देखोल पालम पोलीस तपास करत आहे.

अधिक  वाचा : लग्नाच्या ७ वर्षांनंतर एक-दोन नाही,तब्बल ५ बाळांना दिला जन्म

प्लास्टीक बाटल्या, भंगार वेचण्याचे काम करत होत्या

मिळालेल्या माहितीनुसार, धृपता गंगाराम गंटलवाड या खूप मेहनती होत्या. त्या रोज पालम येथे प्लास्टीक बाटल्या, भंगार वेचण्याचे काम करत होत्या. प्लास्टीक बाटल्या, भंगार वेचण्यासाठी त्या २४ जुलै रोजी रोजच्यासारखे घराबाहेर पडल्या. मात्र, वेळ होऊन देखील त्या रात्री घरी परत आल्या नाहीत. धृपता घरी न आल्यामुळे कुटुंबातील लोकांनी धृपताचा शोध घेण्यासाठी सुरुवात केली. यावेळी सर्व नातेवाईकांकडे शोध घेतला गेला. या दरम्यान, दुसऱ्या दिवशी सायंकाळच्या सुमारास पालम येथे रोडच्या बाजूला नाल्यात महिलेचा मृतदेह आढळून आला.

अधिक वाचा ; जालियनवाला बागेतील विहीरीत नाही दिसणार पैसा, जाणून घ्या का? 

फिट्स आली आणि धृपता नाल्यात पडल्या

दरम्यान, धृपताला फिट्स येत होत्या. त्यामुळे घटनेवेळी तिला फिट्स आली आणि ती नाल्यात पडली. नाल्यातील पाण्यात बुडून मृत्यू तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याबाबत धृपताचा भाऊ सुभाष गंटलवाड यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पालम पोलिसांत आकस्माक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेमुळे पालम शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. आजारपणामुळे तरुण वयातच या तरुणीला आपले प्राण गमावाले लागले असल्याने गंटलवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी