धक्कादायक ! नगरपरिषदेचे ८० ते ८५ लाखांचे भंगार चोरीला, तक्रार मात्र केवळ १३ हजाराची

Aam Aadmi Party made serious allegations against the Chief Executive : नगरपालिकेचे तब्बल ८० ते ८५ लाखांचे सामान चोरीला गेले आहे. मात्र, हे प्रकरण दडपण्यासाठी केवळ १३ हजाराचे सामान चोरीला गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. १३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला असा गुन्हा नोंद केलेला आहे मात्र चोरीचे सामान विकत घेणाऱ्या भंगारवालाकडून नगर परिषदेने २५ हजार भरून घेतले आहे हाच मोठा विरोधाभास व गुन्हा आहे.

Aam Aadmi Party made serious allegations against the Chief Executive
८० ते ८५ लाखांचे भंगार चोरीला, तक्रार मात्र केवळ १३ हजाराची  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • भंगार चोरी प्रकरणी मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे यांच्यावर गंभीर आरोप
  • सखोल तपास करणे आवश्यक असून याबाबत न्यायालयात जाणार – अजित खोत
  • जवळपास ८० ते ८५ लाखांचे सामान चोरी गेले मात्र, केवळ १३ हजाराची तक्रार

उस्मानाबाद : आम आदमी पार्टीचे प्रदेश सदस्य ऍड अजित खोत यांनी उस्मानाबाद नगर परिषदेच्या आवारात झालेल्या भंगार चोरी प्रकरणी उस्मानाबाद नगर परिषदेचे मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नगर परिषदेच्या मालकीची कचरा विलगीकरण मशीन व पत्रा शेड गायब करुन ते विकले असल्याचा आरोप आपचे नेते खोत यांनी केला आहे. नगर परिषद कर्मचारी व ठेकेदार यांना वाचविण्यासाठी मुख्याधिकारी येलगट्टे हे प्रयत्न करीत असल्याचा देखील गंभीर आरोप खोत यांनी केला आहे.

अधिक वाचा : उदय सामंतांवर झालेल्या हल्ल्यानंतर शिंदे गटाचा मोठा निर्णय

सखोल तपास करणे आवश्यक असून याबाबत न्यायालयात जाणार – अजित खोत

दरम्यान, नगरपालिकेच्या भंगारचोरी प्रकरणी स्वच्छता निरीक्षक सुनील कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आनंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीच्या विरोधात ३७९ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर भंगारचोरी प्रकरणात नगर परिषद कर्मचारी व ठेकेदार सहभागी असतानाही अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा नोंद केल्याने या प्रकरणात पोलिसांनी सखोल तपास करणे आवश्यक असून याबाबत न्यायालयात जाणार असल्याचा इशारा आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य ऍड अजित खोत यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.

अधिक वाचा : दुष्ट्यात्म्याच्या संशयावरून सख्ख्या आईवडिलांकडून मुलीचा खून

जवळपास ८० ते ८५ लाखांचे सामान चोरी गेले मात्र, केवळ १३ हजाराची तक्रार

दरम्यान, पुढे बोलताना खोत म्हणाले की, नगरपालिकेचे तब्बल ८० ते ८५ लाखांचे सामान चोरीला गेले आहे. मात्र, हे प्रकरण दडपण्यासाठी केवळ १३ हजाराचे सामान चोरीला गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. १३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला असा गुन्हा नोंद केलेला आहे मात्र चोरीचे सामान विकत घेणाऱ्या भंगारवालाकडून नगर परिषदेने २५ हजार भरून घेतले आहे हाच मोठा विरोधाभास व गुन्हा आहे. असंही खोत यांनी म्हटलं आहे. आणि आरोपीची नावे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झालेली असतानाही त्यांच्या नावाने जाणीवपूर्वक फिर्याद दिली गेली नाही. असंही खोत म्हणाले. 

अधिक वाचा ; Viral News : देवेंद्र फडणवीस उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री! 

तर मग गुन्हा का दाखल होत नाही – खोत

नगरपालिकेचे समान चोरी प्रकरणात ठेकेदार सहभागी असल्याने त्याचे बिल अडविले आहे तर सदर प्रकरणात सहभागी असलेल्या कर्मचारी विलास गोरे यांची वेतन वाढ रोखली आहे असे मुख्याधिकारी सांगतात. तर मग या व्यक्तींवर गुन्हा का नोंद केला जात नाही. हे सगळे प्रकरण गोलमाल आहे त्यामुळे यात वरिष्ठ पोलीस अधिकारी मार्फत तपास करण्याची मागणी आम आदमी पार्टीने केली आहे.

चौकशी अहवाल येत्या बुधवारपर्यंत अपेक्षित असून त्यानुसार देखील कारवाई केली जाईल

सदर प्रकरणी मुख्याधिकारी यलगट्टे यांनी देखील प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, सदर प्रकरणाची चौकशी सुरु आहे. चौकशी अहवाल येत्या बुधवारपर्यंत अपेक्षित असून त्यानुसार देखील कारवाई केली जाणार आहे.यात सहभागी असलेल्या दोषीवर प्रशासकीय कारवाई सुद्धा केली जाणार आहे असे मुख्याधिकारी यलगट्टे यांनी सांगितले. भंगार चोरी प्रकरणी नगर परिषद गंभीर असून सखोल तपास व्हावा यासाठीच अज्ञात आरोपीवर गुन्हा नोंद केला आहे. तपासात पोलिसांना सर्वतोपारी सहकार्य केले जाणार आहे, त्यात अनेक अनपेक्षित बाबी समोर येतील. असंही यलगट्टे यांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी