Aam Admi Parti : शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून आमदार पाटलांचे उपोषण, आम आदमी पार्टीने दिला कैलास पाटलांना पाठिंबा

Aam Aadmi Party supported MLA Kailas Patil's : शेतकऱ्यांकडे पैसे नसल्याने ते दिवाळी हा सण साजरा करू शकत नसल्याने मी देखील दिवाळी साजरी करणार नसल्याचे पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान राज्य स्तरावर शिवसेनेला विरोध करणाऱ्या आम आदमी पार्टीने आमदार कैलास पाटील यांनी केलेल्या उपोषणाला पाठींबा जाहीर केला आहे.

Aam Aadmi Party supported MLA Kailas Patil's
आम आदमी पार्टीचा आमदार कैलास पाटील यांच्या उपोषणाला पाठींबा   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांचे 3 दिवसांपासून उपोषण सुरू
  • पाटील यांच्या उपोषणाला आम आदमी पार्टीने दिला पाठिंबा
  • बळीराजा अडचणीत असताना सत्ताधारी दिवाळी साजरा करत आहेत – अजित खोत

उस्मानाबाद : अतिवृष्टीची नुकसान भरपाई,पीक विमा याचे पैसे सरकार आणि विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना मिळत नसल्याचा आरोप शिवसेना आमदार कैलास पाटील यांनी केलाय. शेतकऱ्यांना पैसा मिळावा यासाठी तीन दिवसांपासून कैलास पाटील उपोषणाला बसले आहेत.जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा आणि अनुदानाचे पैसे येत नाहीत, तोपर्यंत उपोषणावरुन उठणार नसल्याचं आमदार कैलास पाटील यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर, शेतकऱ्यांकडे पैसे नसल्याने ते दिवाळी हा सण साजरा करू शकले नाही, मी देखील दिवाळी साजरी करणार नसल्याचे पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान राज्य स्तरावर शिवसेनेला विरोध करणाऱ्या आम आदमी पार्टीने आमदार कैलास पाटील यांनी केलेल्या उपोषणाला पाठिंबा जाहीर केला आहे. आम आम आदमी पार्टीचे नेते अजित खोत यांनी आमदार कैलास पाटील यांना पाठिंबा जाहीर करत सरकारवर निशाणा साधला आहे.

अधिक वाचा ; मूसेवाला हत्या प्रकरण: अफसाना खानची NIA कडून 5 तास चौकशी

बळीराजा अडचणीत असताना सत्ताधारी दिवाळी साजरा करत आहेत – अजित खोत

अजित खोत यांनी म्हटलं आहे की, जिल्ह्यातील शेतकरी हा अवकाळी पावसामुळे हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दिवाळी साजरी होईल इतके उत्पन्नदेखील शेतकऱ्यांकडे निघाले नाही. शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे पीक हे कुजले जात आहे, मात्र राज्य सरकार अद्यापपर्यंत कुठलाही निर्णय घेत नाही. राज्य सरकारने पंचनामे न करता सरसकट शेतकऱ्यांना मदत करणे अपेक्षित असताना सरकार कोणताच निर्णय घेत नाहीये. सरकारची भूमिका ही शेतकरी विरोधी आहे. त्यामुळे असा एखादा नेता शेतकऱ्यांच्या बाजूने जर लढा देत असेल तर त्या नेत्याला पाठिंबा देणे गरजेचे आहे., म्हणून आम्ही पाठिंबा दिला असल्याचे आमदार खोत यांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा ; बलिप्रतिपदा (दिवाळी पाडवा) Wishes, Facebook-Whatsapp मेसेज 

नेमक्या काय आहेत आमदार कैलास पाटील यांच्या मागण्या?

  1. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, सन 2020 च्या पिक विम्याची 531 कोटी रक्कम जिल्ह्यातील 3 लाख 57 हजार पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तात्काळ जमा करावी.
  2. ही रक्कम शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा करताना शेतकरी संख्या बाधित क्षेत्र आणि नुकसान भरपाईच्या विमा रकमेत कोणतीही छुपी कपात करू नये.
  3. सन 2020-21 च्या पीक विम्याची उर्वरित 50 टक्के म्हणजेच 388 कोटी रुपये विमा पात्र 6 लाख 67 हजार 287 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तात्काळ जमा करावे.
  4. सप्टेंबर 2022 मधील सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 248 कोटी रुपये 2 लाख 48 हजार 801 शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करावे.
  5. चालू खरीप हंगामात सततचा पाऊस अतिवृष्टी आणि ढगफुटीमुळे पिकावरील रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. संपूर्ण पिके उद्ध्वस्त झाली आहेत, त्यामुळे सरसकट दुष्काळ जाहीर करावा आणि पीडित शेतकऱ्यांना जीवघेण्या आर्थिक संकटातून दिलासा द्यावा, अशा काही मागण्या आमदार पाटील यांनी केल्या आहेत.                      

    अधिक वाचा : मार्कस स्टॉइनिसच्या वादळामुळे पार्थवर श्रीलंका टीम उद्धवस्त

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी