मातोश्रीसारख्या पवित्र ठिकाणी 'या' गाढवाला कशाला पाय ठेवू द्यायचा: चंद्रकांत खैरे

औरंगाबाद
Updated Jan 04, 2020 | 17:53 IST | अजहर शेख

शिवसेनेचे आमदार आणि ठाकरे सरकारमधील राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्या राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचं वृत्त आहे. अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.

abdul sattar chandrakant khaire shiv sena leader state minister matoshree uddhav thackeray marathi news
abdul sattar chandrakant khaire shiv sena leader state minister matoshree uddhav thackeray marathi news google  

थोडं पण कामाचं

  • अब्दुल सत्तारांवर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची टीका
  • अब्दुल सत्तार यांनी राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने चंद्रकांत खैरे संतप्त
  • मातोश्रीसारख्या पवित्र ठिकाणी 'या' गाढवाला कशाला पाय ठेवू द्यायचा: चंद्रकांत खैरे

औरंगाबाद: महाराष्ट्र विकास आघाडीच्या मंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर खातेवाटपाची तयारी सुरू आहे. त्याच दरम्यान सिल्लोड विधानसभा मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार शेख यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. अब्दुल सत्तार यांनी आपला राजीनामा पक्ष नेतृत्वाकडे सोपवला असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

अब्दुल सत्तार शेख यांना कॅबिनेट मंत्रिपद दिलं गेलं नसून राज्यमंत्रिपद देण्यात आलं होतं. राज्यमंत्री देताना अब्दुल सत्तार यांना त्यांच्या मर्जीतील खातं देखील मिळाले नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे अब्दुल सत्तार हे नाराज असल्याची देखील माहिती मिळत होती. सत्तार यांनी राजीनामा देताच औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मात्र सत्तारांवर तोडासुख घेतलं आहे. 

एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत असताना "या गाढवाला मातोश्रीवर कशाला पाय ठेवून द्यायचा" अशाप्रकारे चंद्रकांत खैरे यांनी सत्तारांचा समाचार घेतला आहे.
दरम्यान सत्तार यांनी राजीनामाच दिला नसल्याचे विधान माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी केलं आहे. सत्तार हे उद्या उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची चर्चा देखील सुरू आहे. 

अब्दुल सत्तार हे पूर्वी काँग्रेसमध्ये होते लोकसभेच्या निवडणुकीवेळेस अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांना शिवसेनेकडून कॅबिनेट मंत्रिपदाची शब्द देखील देण्यात आला होता अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, ठाकरे सरकारमध्ये त्यांची निराशा झाल्याने त्यांनी आपल्या राज्यमंत्रिपदाचा राजीनामा पक्ष नेतृत्वाकडे सुपूर्त केल्याची माहिती मिळत आहे.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी