अब्दुल सत्तारांचं मोठं विधान, कृषिमंत्रीपद राहणार की जाणार? यावर केलं भाष्य

Abdul Sattar said I will be Agriculture Minister for 2 years ; अब्दुल सत्तार यांनी जनतेशी बोलताना म्हटलं आहे की, मी दोन वर्ष आणि दोन महिने पक्का कृषी मंत्री असणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.कुणी कितीही प्रयत्न केला तरी कृषिमंत्री आपण सोडणार नसल्याचे देखील सत्तार यांनी म्हटलं आहे.

Abdul Sattar said I will be Agriculture Minister for 2 years
अब्दुल सत्तारांचं मोठं विधान,कृषिमंत्रीपद राहणार की जाणार?  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने ते प्रचंड अडचणीत आले होते
  • सत्तार यांच्या मुंबई आणि औरंगाबादमधील घरावर दगडफेक करण्यात आली होती
  • माझ्या कितीही राजीनाम्याची मागणी केली तरी मी दोन वर्ष दोन महिने पक्का कृषीमंत्री राहणार

औरंगाबाद : काही दिवसांपूर्वी राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे  (Supriya Sule) यांच्यावर टीका करत अपशब्द देखील वापरले होते. अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने ते प्रचंड अडचणीत आले होते. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तार यांच्या विरोधात आंदोलने देखील केली होती. काही ठिकाणी सत्तार यांचा पुतळा देखील जाळण्यात आला होता. राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी सत्तार यांच्या मुंबई आणि औरंगाबादमधील घरावर दगडफेक करून आपला संताप व्यक्त केला. त्याचबरोबर अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली होती. त्यामुळे अब्दुल सत्तार हे राजीनामा देतील अशी शक्यता वर्तवण्यात आली असताना सत्तार यांनी मोठं विधान केलं आहे. माझ्या कितीही राजीनाम्याची मागणी केली तरी मी दोन वर्ष दोन महिने पक्का कृषी मंत्री म्हणून काम करणार आहे, असं सूचक विधान अब्दुल सत्तार यांनी केलं आहे.

अधिक वाचा ; ऑफिस किंवा घरी तासनतास बसून काम केल्यास लागतील हे आजार

कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका – अब्दुल सत्तार

दरम्यान, अब्दुल सत्तार यांनी जनतेशी बोलताना म्हटलं आहे की, मी दोन वर्ष आणि दोन महिने पक्का कृषी मंत्री असणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.कुणी कितीही प्रयत्न केला तरी कृषिमंत्री आपण सोडणार नसल्याचे देखील सत्तार यांनी म्हटलं आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. उलट नागरिकांनी कृषी विभागाचा लाभ घ्यावा, असंही सत्तार यांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा ; पोलीस थेट लॉजमध्ये घुसले, आणि समोर आली धक्कादायक घटना 

आपल्या वडीलधाऱ्यांनी आपल्याला खालच्या पातळीवर टीका करण्याचं शिकवलं नाही – अजित पवार

अब्दुल सत्तार यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कालच झापलं होतं. आपल्या वडीलधाऱ्यांनी आपल्याला खालच्या पातळीवर टीका करण्याचं शिकवलं नाही. ते आपले संस्कार नाहीत. आपली संस्कृती नाही. महाराष्ट्राची परंपरा नाही. त्यामुळे कोणत्याच पक्षाच्या नेते आणि प्रवक्त्यांकडून कोणतीही आक्षेपार्ह विधाने होऊ नयेत, असं अजित पवार यांनी अब्दुल सत्तार यांना म्हणाले होते.

अधिक वाचा ; मुंबईत पार पाडली जियो सायक्लॉथॉन, टायगर श्रॉफने लावली हजेरी

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी