Abdul Sattar: कृषीमंत्र्यांकडून सुप्रिया सुळेंना शिवीगाळ, पन्नास खोके... एकदम ओक्केवरून अब्दुल सत्तार चिडले

Aurangabad : राज्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विरोधीपक्षाकडून राज्याच ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली असताना राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचा एका वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगला व्हायरल होत आहे.

Abdul Sattar: Supriya Sule was abused by the Agriculture Minister, fifty boxes... Abdul Sattar got angry from Okke
Abdul Sattar: कृषीमंत्र्यांकडून सुप्रिया सुळेंना शिवीगाळ, पन्नास खोके... एकदम ओक्केवरून अब्दुल सत्तार चिडले ।   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • अब्दुल सत्तार यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत
  • सुप्रिया सुळे यांना शिवागाळ
  • सुप्रिया सुळेंचा एकेरी उल्लेख करत त्यांना शिवी घातली

औरंगाबाद : शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. राज्यात सर्वत्र अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे विरोधी पक्षांकडून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. दरम्यान, असे असताना राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचा एक सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.  (Abdul Sattar: Supriya Sule was abused by the Agriculture Minister, fifty boxes... Abdul Sattar got angry from Okke)

अधिक वाचा : Raigad accident: मुंबई-गोवा महामार्गावर ट्रेलर पलटी, अपघातामुळे वाहतुकीवर परिणाम, VIDEO

काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आलेल्या कृषीमंत्री सत्तार यांचा एक व्हिडिओ समोर आला होता. ज्यामध्ये बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांना दारू पितात का? असे विचारत होते. त्यानंतर निर्माण झालेल्या वादानंतर त्यांनी सारवासारव केली.

अधिक वाचा : ​Shivsena : पहिल्यांदाचं शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या प्रमुखांचे पुत्र आमने - सामने, पोलिसांनी केला तगडा बंदोबस्त

त्यानंतर आज औरंगाबाद येथे ‘लोकशाही’ वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीशी बोलताना सत्तार यांना सुप्रिया सुळेंबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तुम्ही सुप्रिया सुळेंना खोके देण्याची ऑफर केल्यावरुन त्यांनी तुमच्याकडे आले असतील खोके म्हणूनच तुम्ही खोके देण्यासाठी तयार झाला आहात, असं म्हटलं आहे. यावर काय सांगाल असं सत्तार यांना विचारण्यात आलं. या प्रश्नावर सत्तार यांनी सुप्रिया सुळेंचा एकेरी उल्लेख करत त्यांना शिवी घातली. “इतकी भिकार** झाली असेल सुप्रिया सुळे तर तिलाही देऊ,” असं उत्तर सत्तार यांनी दिलं.

दरम्यान, आज शिवसेना ठाकरे गटाकडून अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोडमध्ये आमदारा आदित्य ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खा. श्रीकांत शिंदे हे सिल्लोडच्या जिल्हा परिषदेच्या मैदानावर सभा घेणार आहेत. त्यामुळे आज शिंदे गट आणि अब्दुल सत्तार यांच्याकडून सभास्थळी मोठे शक्तीप्रदर्शन होण्याची शक्यता आहे. यानिमित्ताने ठाकरे विरुध्द शिंदे असा सामना आज रंगत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी