Income Tax : आयकर विभागाच्या धाडीनंतर अभिजीत पाटलांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...

Abhijit Patal's big statement after the Income Tax Department raid : कारखाने एका मागून एक कुठून आले इतका पैसा कुठून आला त्यावर आम्ही सांगितले की काही कारखाने हे कर्ज घेऊन भाडेतत्वावर घेतले आहेत, त्यामुळे त्याला भांडवलाची गरज नाही. जे काही होते ते सगळे रेकॉर्डवर होते. धाडीत कुठेही अवैध पैसा, सोने किंवा इतर मालमत्ता सापडली नाही त्यांना दिलेल्या माहितीमुळे आयकर विभागाच्या अधिकारी यांचे समाधान झाले असल्याचे अभिजीत पाटील यांनी म्हटलं आहे.

Abhijit Patal's big statement after the Income Tax Department raid
आयकर विभागाच्या धाडीनंतर अभिजीत पाटलांचं मोठं वक्तव्य  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • धाडीत कुठेही अवैध पैसा, सोने किंवा इतर मालमत्ता सापडली नाही - अभिजित पाटील
  • आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी काही कागदासाठी १५ दिवसांचा अवधी दिला
  • माझा वारू रोखला पाहिजे यासाठी विरोधकांनी षडयंत्र - अभिजित पाटील

उस्मानाबाद :  अल्पावधीत साखरसम्राट अशी ओळख झालेल्या धाराशिव साखर कारखान्याचे तथा डी व्ही पी ग्रुपचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या कारखान्यावरील कार्यालयावर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली होती.  आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांची सदर कारवाई २ दिवस चालली या कारवाईत आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना काहीही मिळाले नसल्याचे डी व्ही पी ग्रुपचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर आयकर विभागाला चुकीची माहिती दिली गेली असल्याचं देखील पाटील यांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा ;  वजन कमी करताना चुकूनही Breakfast ला खाऊ नका 'या' गोष्टी

धाडीत कुठेही अवैध पैसा, सोने किंवा इतर मालमत्ता सापडली नाही – अभिजीत पाटील

दरम्यान,पुढे बोलताना अभिजीत पाटील म्हणाले की,  कारखाने एका मागून एक कुठून आले इतका पैसा कुठून आला त्यावर आम्ही सांगितले की काही कारखाने हे कर्ज घेऊन भाडेतत्वावर घेतले आहेत, त्यामुळे त्याला भांडवलाची गरज नाही. जे काही होते ते सगळे रेकॉर्डवर होते. धाडीत कुठेही अवैध पैसा, सोने किंवा इतर मालमत्ता सापडली नाही त्यांना दिलेल्या माहितीमुळे आयकर विभागाच्या अधिकारी यांचे समाधान झाले. त्यांनी मागणी केल्या प्रमाणे कागदपत्रांची पूर्तता केली व काही कागदासाठी १५ दिवसांचा अवधी दिला आहे त्यात ती दिली जाईल असं पाटील यांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा ; विमानांची समोरासमोर टक्कर होऊन 583 जणांचा मृत्यू

माझा वारू रोखला पाहिजे यासाठी विरोधकांनी षडयंत्र

विठ्ठल कारखाना माझ्याकडे शेतकरी सभासदांनी दिला त्यानंतर आयकर विभागाच्या कारवाईत काही न सापडल्याने मी उजळ माथ्याने फिरू शकतो त्यामुळे मला विठ्ठल या कारवाईने कोपला नाही तर विठ्ठल पुन्हा एकदा पावला अशी प्रतिक्रिया पाटील यांनी दिली. मी जे काही केले कामाविले ते प्रामाणिकपणे केले. मी गेल्या २ महिन्याखाली पंढरपूर येथील विठ्ठल सहकारी कारखान्याची निवडणूक लढाविली त्यात मला यश आले त्यामुळे माझा वारू रोखला पाहिजे यासाठी विरोधकांनी षडयंत्र रचले. असा आरोप अभिजीत पाटील यांनी केला आहे. 

अधिक वाचा ; भारताच्या शॉर्ट बॉलने केला पाकिस्तानचा घात 

विरोधकांना जसाच तसे उत्तर दिले जाईल

आता विरोधकांनी माझे आव्हान पेलून दाखवावे, त्यांच्या काही गोष्टी आता बाजारात येतील असा इशारा पाटील यांनी विरोधकांना दिला. विठ्ठल कारखाना जिंकल्यावर खऱ्या अर्थाने काही जणांना माझी भीती वाटू लागली. असल्याचं देखील अभिजीत पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान, राजकीय विरोधातून हे सगळे केले गेले, विरोधकांना जसाच तसे उत्तर दिले जाईल, विरोधकांचे नाव सगळ्यांना माहित आहे ते योग्य वेळी जाहीर करू, जे झाले आहे ते चांगले झाले त्यामुळे येणाऱ्या काळात मी चौपाट ताकतीने काम करेल व या भागातील लोकांना रोजगार, उसाचा प्रश्न मार्गी लावेल व या कारवाईतून मला बळ मिळाले आहे. विरोधकांनी जे आव्हान दिले होते ते मी पेलले आहे, त्यांना यातून काही शक्य झाले नसल्याचे देखील पाटील म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी