Aurangabad Crime: पोलिसांनी खिचडी वाटपाचा कार्यक्रम ठेवून दरोडेखोरांना केली सिनेस्टाईल अटक

औरंगाबाद
Updated Sep 22, 2022 | 13:08 IST | टाइम्स नाऊ मराठी

Accused who are accused in 27 crimes have been arrested by the police: औरंगाबाद शहरातील आदालत रोडवरील पगारिया शोरूम फोडल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. खबऱ्याद्वारे मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपींना अटक केली आहे.

accused who are accused in 27 crimes have been arrested by the police
खिचडी वाटपाचा कार्यक्रम ठेवून दरोडेखोरांना पोलिसांनी केली अटक  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • 28 गुन्ह्यातील आरोपींना पोलिसांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले आहे.
  • आरोपी सतत पोलिसांना गुंगारा देऊन पसार व्हायचे
  •  आरोपींवर महाराष्ट्रसह गुजरातमध्येही गुन्हे दाखल आहेत

औरंगाबाद : तब्बल 28 गुन्ह्यातील आरोपींना पोलिसांनी (Police) मोठ्या शिताफीने ताब्यात  घेतले आहे. या आरोपींनी काही दिवसांपूर्वी औरंगाबाद शहरातील (Aurangabad City) आदालत रोडवरील पगारिया शोरूम फोडले होते. यांनतर पोलीस या आरोपींच्या अनेक दिवसांपासून मागावर होते. मात्र, हे आरोपी सतत पोलिसांना गुंगारा देऊन पसार व्हायचे. दरम्यान, सदर गुन्हेगारांची 8 जणांची टोळी होती. 8 जणांच्या टोळीतील 3 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींवर 27 गुन्हे दाखल असून यातील 14 गुन्हे शोरूम फोडीचे आहे. औरंगाबादच्या गुन्हे शाखेने (Aurangabad Local Crime Branch) जळगाव येथून या आरोपींना ताब्यात घेतले आहे. (accused who are accused in 27 crimes have been arrested by the police)

अधिक वाचा ; आजचे राशीभविष्य; 'या' राशींसाठी आजचा दिवस शुभ, होईल भरभराट

 आरोपींवर महाराष्ट्रसह गुजरातमध्येही गुन्हे दाखल आहेत

दरम्यान, पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी अटक केलेले आरोपी हे अट्टल चोरी करणारे आहेत. त्यांच्यावर एकूण 27 गुन्हे दाखल असून, महाराष्ट्रसह गुजरात राज्यामध्ये देखील त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. आठ जणांची ही टोळी शोरूम फोडण्यात माहीर असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. कारण आरोपींवर आतापर्यंत 14 गुन्हे शोरूम फोडण्याचे दाखल आहेत. सदर टोळीचा म्होरक्या सोनू मोहिते असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली असून, आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. तर आणखी पाच जण फरार असून, त्यांचा सुद्धा पोलीस शोध घेत आहेत. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी हे आरोपी राहत होते त्या ठिकाणी 200 पाल होते. या 200 पालमधून तिघांचे शोध घेणे अवघड होते. मात्र, पोलिसांनी मोठ्या शिताफीने 3 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

अधिक वाचा ; मला कोणाला चुना लावण्याची गरज भासली नाही: एकनाथ खडसे 

असं करण्यात आले आरोपींना अटक?

पोलिसांना आरोपी हे पालीत राहत असल्याची गुप्त खबऱ्याद्वारे माहिती मिळाली. मात्र, ज्या ठिकाणी आरोपी राहत होते, त्या ठिकाणी 200 पाल होते. या 200 पालमधून तिघांचे शोध घेणे अवघड होते. त्यामुळे आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळी शक्कल लढवली. पोलिसांनी पालीत खिचडी वाटपाचा कार्यक्रम ठेवला. त्यानुसार पोलिसांनी अंदाजे दहा किलो तांदळाची खिचडी आणून वाटप सुरू केले, परंतु खिचडी वाटप करत असताना पोलिसांच्या हे लक्षात आले की, खिचडी घेण्यासाठी फक्त महिला व लहान मुले आली आहेत. त्यामुळे दुसऱ्या दिवशी पोलीस पथक मॉर्निंग वॉक करीत पालांच्या परिसरात गेले. तेथेच थांबून जे लोक दुचाकीवरून बांगड्या विक्रीसाठी बाहेर पडत आहेत, त्यांच्यावर त्यांनी नजर ठेवली. यावेळी पोलिसांकडे असलेल्या फोटोतील संशयित आरोपी दिसला. यावेळी पोलिसांनी त्याचा  पाठलाग केला आणि त्यासह तिघांना अटक केली.

अधिक वाचा ; आजचे राशीभविष्य; 'या' राशींसाठी आजचा दिवस शुभ, होईल भरभराट 

अशी आहेत पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे

शिवा नागूलाल मोहिते वय 32, सोनू नागूलाल मोहिते वय 25, अजय सीताराम चव्हाण 32 अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

फरार आरोपींची नावे

अभिषेक देवराम मोहिते वय 19, जितू मंगलसिंग बेलदारवय 24, विशाल भाऊलल जाधव वय 22, बादल हिरालाल जाधव वय 19, करण गजेंदर वय 25 अशी फरार आरोपींची नावे आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी