आदित्य ठाकरे यांचा मराठवाडा दौरा करणार, नुकसान झालेल्या पिकांची करणार पाहणी

औरंगाबाद
Updated Nov 01, 2022 | 23:33 IST | टाइम्स नाऊ मराठी

Aditya Thackeray will visit Marathwada : आदित्य ठाकरे हे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहे. दरम्यान याचवेळी ग्रामीण भागातील एका गावात आदित्य ठाकरे यांचा शेतकरी मेळावा होण्याची देखील शक्यता आहे.

Aditya Thackeray will visit Marathwada
आदित्य ठाकरे यांचा मराठवाडा दौरा करणार  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आदित्य ठाकरे हे मराठवाडा दौऱ्यावर येणार
  • स्थानिक पदाधिकारी यांना तयारीबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
  • आदित्य ठाकरे यांनी पुणे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली होती.

औरंगाबाद : माजी मंत्री आदित्य ठाकरे हे मराठवाडा दौऱ्यावर येणार आहेत. आदित्य ठाकरे हे येत्या 8 नोव्हेंबरला औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या काही दिवसात मराठवाड्याला परतीच्या पावसाने चांगले झोडपले होते. ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले होते. शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी आदित्य ठाकरे यांचा हा दौरा असणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सोबतच यावेळी शेतकऱ्यांशी संवाद देखील साधणार असल्याचे बोलले जात आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील येत्या 26 नोव्हेंबरला बुलढाण्यातील चिखलीत शेतकरी मेळावा घेणार असतानाच, आता युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे देखील मराठवाड्याचा दौरा करणार असल्याने ठाकरे यांच्या या दौऱ्यानंतर शेतकऱ्यांच्या पदरात कोणती मदत पडते का याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे. (Aditya Thackeray will visit Marathwada)

अधिक वाचा : नागपूर महामार्गावर Burning बसचा थरार; 35 प्रवासी असलेल्या ST ला भीषण आग

आदित्य ठाकरे यांनी पुणे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली होती.

दरम्यान, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी गेल्या आठवड्यातच पुणे जिल्ह्याचा दौरा केला होता. यावेळी आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतला होत्या. आता ठाकरे औरंगाबादच्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.सर्वच राजकीय पक्षातील नेते मुसळधार पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतांना पाहायला मिळत आहे. दरम्यान, 8 नोव्हेंबरला हा दौरा होण्याची शक्यता असून, त्यानुसार स्थानिक नेत्यांकडून तयारी करण्यात येत आहे.

अधिक वाचा : Shocking!, दिला नाही मोबाईलच्या Hotspot चा पासवर्ड, गमवावा लागला जीव

स्थानिक पदाधिकारी यांना तयारीबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आदित्य ठाकरे यांचा औरंगाबाद जिल्ह्यात असणार आहे. औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या मतदारसंघातचं आदित्य ठाकरे यांचा दौरा असणार आहे. यासाठी स्थानिक पदाधिकारी यांना तयारीबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे यापूर्वी देखील आदित्य ठाकरे यांनी भुमरे यांच्या मतदारसंघात रॅली काढली होती.  

आदित्य ठाकरे यांचा शेतकरी मेळावा होण्याची देखील शक्यता

आदित्य ठाकरे हे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहे. दरम्यान याचवेळी ग्रामीण भागातील एका गावात आदित्य ठाकरे यांचा शेतकरी मेळावा होण्याची देखील शक्यता आहे. यावेळी ते शेतकऱ्यांसोबत संवाद देखील साधणार असल्याचे बोलले जात आहे. तर उद्या परवा याबाबत पक्षाकडून अधिकृत माहिती देखील दिली जाणार असल्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी