बीड : बीडमध्ये एकाने डॉक्टर बनून नको ते प्रकार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका रुग्णालयात कंपाऊंडर म्हणून काम करत असलेला हा व्यक्ती थेट डॉक्टर बनून निसर्गोपचार केंद्राच्या नावाखाली अवैध गर्भपात केंद्र चालवायचा अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. सदर डॉक्टरचे नाव नंदकुमार स्वामी असं असून, स्वामी याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. न्यायालयाने नंदकुमार स्वामी याला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
अधिक वाचा ; हे 3 लिंबू पेय किडनीसाठी आहेत फायदेशीर, किडनी होईल स्वच्छ
मिळालेल्या माहितीनुसार नंदकुमार स्वामी हा एका रुग्णालयात कंपाऊंडर म्हणून काम करत होता. त्यानंतर त्याने निसर्गोपचार केंद्र सुरु केले आणि यामध्ये तो महिलांचे अवैद्य गर्भपात देखील करू लागला. डॉ. स्वामीवर यापूर्वीसुद्धा अवैध गर्भपाताचे ३ गुन्हे दाखल आहेत. मुलाच्या हव्यासापोटी विवाहितेचा निर्दयीपणे अवैध गर्भपात केल्याची घटना ३ दिवसांपूर्वी परळीत उघडकीस आली आहे. हे अवैद्य गर्भपात प्रकरणाऱ्या डॉ. नंदकुमार स्वामी याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, आरोपी डॉक्टरला काल सायंकाळी उशिरा, न्यायालयाने ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
अधिक वाचा ; मंत्रालयापासून काही अंतरावर घडली घटना, दोन पोलिसांचं निधन
पती आणि सासूच्या सांगण्यावरून डॉक्टरनं एका महिलेला एक इंजेक्शन देत, महिलेच्या इच्छेविरोधात अवैधरित्या गर्भपात केला असल्याचं सध्या उघड झालं आहे. सदर घटना परळी शहरात घडली आहे. परळीतील एक जोडप्यान एका मित्राच्या मदतीने, डॉ. स्वामीकडे अवैधपणे गर्भलिंग चाचणी केली. त्यात त्या दाम्पत्याला दुसऱ्यांदा मुलगी होणार असं डॉक्टरन जोडप्याला सांगितले. यानंतर आपल्याला दुसरी मुलगी होणार हे कळल्यानंतर पती आणि सासूच्या सांगण्यावरून डॉक्टरने महिलेच्या इच्छेविरुद्ध गर्भपात केला.
अधिक वाचा : सोने-चांदीच्या भावात वाढ, पटापट पाहा ताजा भाव
मिळालेल्या माहितीनुसार, नंदकुमार स्वामी हा मूळचा सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील आहे. तो डॉक्टर नसून एका रुग्णालयात कंपाउंडर म्हणून काम करत होता. नंदकुमार स्वामी याला रुग्णालयात काम करत असताना मोठा अनुभव आला होता. तो लोकांसमोर डॉक्टर म्हणून वावरू लागला. बार्शीतल्या दत्तनगर परिसरात निसर्गोपचार केंद्राच्या नावाखाली त्याने अवैध गर्भपात केंद्र सुरु केले. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा देखील झाला होता.
दरम्यान, स्वामी यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला शिक्षा देखील लागली होती. यानंतर ३ वर्षाची शिक्षा भोगल्यानंतर बार्शी सत्र न्यायालयाने नंदकुमार स्वामीला जामीन मंजूर केला. जामीनावर बाहेर असलेल्या स्वामीने बीडमध्ये पुन्हा अवैध गर्भपात करायला सुरुवात केली असल्याची माहिती मिळाली आहे.