पुन्हा एका महाराजांवर बलात्काराचा गुन्हा दाखल, २९ वर्षीय महिलेने केली होती तक्रार

Again a case of rape has been filed against a Maharaj ; ४ ऑगस्ट रोजी मोहरी येथील एका २९ वर्षीय महिलेने, रात्री १० वाजण्याच्या दरम्यान,  खर्डा पोलीस ठाण्यात खाडे यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. या तक्रारीत महिलेने म्हटले आहे की, जून ते १२ जुलै २०२२ दरम्यान मठाधिपती बुवासाहेब जिजाबा खाडे यांनी, सोन्याचे दागिने व लग्न करण्याचे आमिष दाखवून वेळोवेळी बळजबरीने लैंगिक अत्याचार केला.

Again a case of rape has been filed against a Maharaj
पुन्हा एका महाराजांवर बलात्काराचा गुन्हा दाखल  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • बीड जिल्ह्यातील बुवासाहेब खाडे महाराज यांच्यावर बलात्काराचा गुन्हा नोंद
  • महिलेने केली खाडे महाराज यांच्या विरोधात बलात्काराची तक्रार
  • खाडे महाराज यांच्यावर पिडीत महिलेने अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली

बीड : एका 29 वर्षीय महिलेने बीड जिल्ह्यातील बुवासाहेब खाडे महाराज यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. सदर महिलेने बुवासाहेब खाडे महाराज यांच्यावर बलात्काराचा आरोप करत पोलीसात तक्रार देखील दाखल केली आहे. सदर घटनेमुळे जिल्ह्यात एकंच खळबळ उडाली आहे. पाटोदा तालुक्यातील सावरगाव येथील श्री क्षेत्र हनुमानगडचे मठाधिपती, बुवासाहेब खाडे महाराज हे महिलेने केलेल्या बलात्काराच्या आरोपामुळे वादात सापडले आहेत. खाडे महाराज यांच्यावर पिडीत महिलेने अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, महिलेने तक्रार करण्यापूर्वी मठाधिपतींनीही मारहाण करून धमकावल्याप्रकरणी ५ जणांवर गुन्हा नोंदविला होता.

अधिक वाचा ; फक्त 9 रुपयांत विमान प्रवास, या विमान कंपनीची धमाकेदार ऑफर

नेमकं काय आहे प्रकरण?

महिलेने तक्रार करण्यापूर्वी हनुमानगडाचे मठाधिपती बुवासाहेब जिजाबा खाडे वय ५६ यांनी ५ जणांविरोधात मारहाण करून जीवे मारण्याची तक्रार खर्डा पोलीस ठाण्यात दिली होती. यावरून खर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. खाडे महाराज यांनी भिवा गोपाळघरे, राहुल गिते, बाजीराव गित्ते, अरुण गिते, व रामा गिते यांच्यावर गंभीर आरोप करत तक्रार दिली होती की, या ५ जणांनी २९ जुलै रोजी ते जामखेड तालुक्यातील मोहरी येथे महादेवाच्या मंदिराचे काम पाहण्यासाठी गेले होतो. यावेळी यांनी मठाधिपती खाडे यांना घुगे वस्तीवरील बाजीराव गिते यांच्या घरात बोलावून घेतले. आणि पहाटे दीड वाजण्याच्या दरम्यान लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. यावेळी या ५ जणांनी जीवे मारण्याची धमकी देत सोन्याची चेन, अंगठ्या, मणी असा १३ लाख ६० हजार रुपयांचा ऐवज काढून घेतला. त्याचबरोबर दोरी दाखवून फाशी देण्याची धमकी दिली आणि पहाटे वाजता तो कोयता घेऊन अंगावर धावला. अशा स्वरूपाच्या फिर्यादीवरून, खर्डा पोलीस ठाण्यात ५ जणांवर ३ ऑगस्ट रोजी गुन्हा नोंद झाला आहे.

अधिक वाचा ; उपराष्ट्रपतीपदासाठी आज सकाळी १० ते ५ मतदान नंतर मतमोजणी

महिलेने केली खाडे महाराज यांच्या विरोधात बलात्काराची तक्रार

खाडे महाराज यांनी ३ ऑगस्ट रोजी ५ जणांविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजेच ४ ऑगस्ट रोजी मोहरी येथील एका २९ वर्षीय महिलेने, रात्री १० वाजण्याच्या दरम्यान,  खर्डा पोलीस ठाण्यात खाडे यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. या तक्रारीत महिलेने म्हटले आहे की, जून ते १२ जुलै २०२२ दरम्यान मठाधिपती बुवासाहेब जिजाबा खाडे यांनी, सोन्याचे दागिने व लग्न करण्याचे आमिष दाखवून वेळोवेळी बळजबरीने लैंगिक अत्याचार केला. महिलेने दिलेल्या तक्रारीवरून मठाधिपती बुवासाहेब खाडे यांच्यावर खर्डा पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक वाचा ; या दिवशी होणार शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी