खेद व्यक्त करतो आणि माझा शब्द मागे घेतो, सॉरी म्हणत सत्तारांनी घेतले एक पाऊल मागे

Agriculture Minister Abdul Sattar apologized ; वाढता विरोध पाहता सत्तार यांनी एक पाऊल मागे घेतले घेत माफी मागितली आहे. माझ्या बोलण्याने जर कोणाची मने दुखावली असतील  तर मी त्याबद्दल खेद व्यक्त करतो आणि माझा शब्द मागे घेतो, सॉरी म्हणतो असे म्हणत अब्दुल सत्तार (Abdul Sattar ) यांनी महिला वर्गाची माफी मागितली आहे. 

Agriculture Minister Abdul Sattar apologized
द व्यक्त करतो आणि माझा शब्द मागे घेतो, सॉरी - अब्दुल सत्तार   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अखेर अब्दुल सत्तार यांनी मागितली माफी
  • सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केली होती खालच्या पातळीची टीका
  • मी महिलांचा सन्मान करणारा नेता आहे - अब्दुल सत्तार

औरंगाबाद  : राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर अगदी खालच्या भाषेत टीका केली होती. सुळे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर राज्यात राष्ट्रवादी आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले होते. सत्तार यांनी माफी मागावी अशी मागणी देखील राष्ट्रवादीने केली होती. दरम्यान, वाढता विरोध पाहता सत्तार यांनी एक पाऊल मागे घेतले घेत माफी मागितली आहे. माझ्या बोलण्याने जर कोणाची मने दुखावली असतील  तर मी त्याबद्दल खेद व्यक्त करतो आणि माझा शब्द मागे घेतो, सॉरी म्हणतो असे म्हणत अब्दुल सत्तार (Abdul Sattar ) यांनी महिला वर्गाची माफी मागितली आहे. 

अधिक वाचा ; देव दिवाळीसाठी 10 लाख दिवे, 50 टन फुलं अशी जय्यत तयारी

नेमकं काय म्हणाले अब्दुल सत्तार?

दरम्यान, काही वेळापूर्वी कृषिमंत्री सत्तार यांनी आपण माफी मागणार नसल्याचे म्हटलं होतं. मात्र, सत्तार यांनी केलेल्या वक्तव्यावरून राज्यात मोठा गोंधळ सुरु झाला होता. यामुळे सत्तार यांनी अखेर माफी मागावीच लागली आहे. "मी कोणत्याही महिला भगिनींच्या बाबतीत अपशब्द बोललो नाही. आम्हाला जे बदनाम करत आहेत, त्यांच्याबद्दल बोललो आहे. असं सत्तार यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना सत्तार यांनी म्हटलं की,  राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिय सुळे  यांच्याबद्दल किंवा कोणत्याच महिलेबद्दल मी काहीच बोललो नाही. महिलांची मने दुखावतील असा कोणताच शब्द बोललो नाही. परंतु, माझ्या बोलण्याने जर कोणाची मने दुखावली असतील  तर मी त्याबद्दल खेद व्यक्त करतो आणि माझा शब्द मागे घेतो, सॉरी म्हणतो असे म्हणत अब्दुल सत्तार यांनी महिला वर्गाची माफी मागितली आहे. 

अधिक वाचा ; मारुतीच्या 30 किमी मायलेज देणाऱ्या 3 नवीन स्वस्त सीएनजी कार 

मी महिलांचा सन्मान करणारा नेता आहे

पुढे बोलताना सत्तार यांनी म्हटलं की, "मी जे बोललो ते फक्त खोक्यांच्याबद्दल बोललो. परंतु, त्याचा कोणी वेगळा अर्थ काढू नये. मी महिलांचा सन्मान करणारा नेता आहे. मी कोणत्याही महिलेच्या विरोधात बोललो नाही, असं अब्दुल सत्तार यांनी यावेळी म्हटले. परंतु, माफी मागत असताना सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांचं नाव घेण्याचं टाळलं होत.

अधिक वाचा ; वेगळ्या ग्रहावरून आलाय हा खेळाडू, PAK क्रिकेटरने केली कमेंट

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी