कृषीमंत्री अब्दुल सत्तारांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका, म्हणाले 'छोटा पप्पू गोधडीमध्ये होता, तेव्हा मी......

Agriculture Minister Abdul Sattar's venomous criticism of Aditya Thackeray ; महाराष्ट्रात सरकार चांगलं आणि गतिमान चालत आहे. त्यामुळे त्यांच्या पोटात पोटशूळ उठतोय, अशी घणाघाती टीका कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केली आहे.

Agriculture Minister Abdul Sattar's venomous criticism of Aditya Thackeray
कृषीमंत्री अब्दुल सत्तारांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरेंचा केला छोटा पप्पू म्हणून उल्लेख
  • महाराष्ट्रात सरकार चांगलं आणि गतिमान चालत आहे – अब्दुल सत्तार
  • 21 सप्टेंबर 2021 ला हा प्रकल्प गुजरातला गेला, तेव्हा त्यांचे वडील मुख्यमंत्री होते – अब्दुल सत्तार

हिंगोली : राज्याचे कृषिमंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राज्याचे माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thakrey) यांच्यावर जहरी टीका केली आहे. अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना आदित्य ठाकरे यांचा उल्लेख त्यांनी छोटा पप्पू असा केला आहे. “छोटा पप्पू काही बोलू शकतो याच्याबद्दल मला आश्चर्य वाटतं”. असं देखील अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे. आदित्य ठाकरे जेव्हा गोधडीमध्ये होते, तेव्हा मी शेतकऱ्यांचे नेतृत्व करत होतो, असं कृषिमंत्री सत्तार यांनी आदित्य ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना म्हटलं आहे.

अधिक वाचा ; इलॉन मस्क आणि पराग अग्रवालचे संबंध का बिघडले, नेमके काय झाले

महाराष्ट्रात सरकार चांगलं आणि गतिमान चालत आहे – अब्दुल सत्तार

दरम्यान, आज अब्दुल सत्तार हे आज हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे गटावर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रात सरकार चांगलं आणि गतिमान चालत आहे. त्यामुळे त्यांच्या पोटात पोटशूळ उठतोय, अशी घणाघाती टीका कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केली आहे. पुढे सत्तार म्हणाले, की आता हे गोधडीमधून निघालेले लोक आता लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपी सत्तार यांनी यावेळी केला आहे.

अधिक वाचा ; Optical Illusion: शोधून-शोधून थकला तरीही सापडला नाही बूट..

21 सप्टेंबर 2021 ला हा प्रकल्प गुजरातला गेला, तेव्हा त्यांचे वडील मुख्यमंत्री होते – अब्दुल सत्तार

21 सप्टेंबर 2021 ला हा प्रकल्प गुजरातला गेला. तेव्हा त्यांचे वडील मुख्यमंत्री होते आणि जे बोलत आहेत ते तेव्हा कॅबिनेट मंत्री होते, असं प्रत्युत्तर सत्तार यांनी आदित्य ठाकरेंना दिलं आहे. त्याचबरोबर तेव्हा नेमकी काय तारीख होती? हे बारकाईनं पाहिलं तर त्यांच्या सगळं लक्षात येईल. असं देखील अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा : हा खेळाडू कसा बनला PAK च्या 22.5 कोटी लोकांसाठी व्हिलन? 

खोके सरकारवर उद्योगजगताचा विश्वास उरलेला नाही – आदित्य ठाकरे यांनी केली होती टीका

माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील सरकारवर जोरदार टीका केली होती. गेल्या तीन महिन्यांपासून सातत्याने महाराष्ट्रातले प्रकल्प बाहेर का जात आहेत? खोके सरकारवर उद्योगजगताचा विश्वास उरलेला नाही, हे तर दिसतच आहे. आता ४ प्रकल्प महाराष्ट्रातून निसटल्यावर तरी उद्योगमंत्री राजीनामा देणार का? असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला होता. यावरही अब्दुल सत्तार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्याचबरोबर, टाटा एअरबस निर्मिती प्रकल्प गुजरातला होणार असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं होतं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी