स्टिंग ऑपरेशनवर सवाल उठवणाऱ्या अनिल बोंडेंना लगावला कृषिमंत्र्यांनी टोला

औरंगाबाद
अजहर शेख
Updated Jun 22, 2020 | 22:54 IST

Dada Bhuse replied to Anil Bonde: राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांना टोला लागावला आहे. अनिल बोंडे यांनी दादा भुसे यांच्या स्टिंग ऑपरेशन वरती सवाल उपस्थित केला होता.

Dada Bhuse replied to Anil Bonde
अनिल बोंडेंना लगावला कृषिमंत्र्यांनी टोला  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • उस्मानाबादेत अनिल बोंडे यांच्या टीकेला दादा भुसे यांनी टोला लगावत दिले उत्तर
  • दादा भुसे यांनी टाकलेली धाड मॅनेज असल्याचे बोलले होते अनिल बोंडे
  • अनिल बोंडे यांच्या टीकेला दादा भुसे यांनी टोला मारत उत्तर दिले आहे.

उस्मानाबाद: राज्याचे कृषिमंत्री (Agriculture minister) दादा भुसे (dada bhuse ) यांनी काल औरंगाबाद (Aurangabad ) येथील एका बियाणांच्या दुकानावर स्वतः धाड मारली मारली होती. कृषिमंत्री दादा भुसे यांनी मारलेल्या धाडीचा व्हिडिओ हा प्रचंड व्हायरल झाला होता. दरम्यान, दादा भुसे यांनी मारलेली धाड नौटंकी आणि नाटक असल्याचा आरोप माजी कृषिमंत्री अनिल बोंडे (anil bonde )  यांनी केला होता. यावर दादा भुसे यांनी उस्मानाबाद (Osmanabad) येथे टोला लगावला आहे.

काय म्हणाले मंत्री दादा भुसे

दादा भुसे हे आज उस्मानाबाद जिल्ह्याच्या (osmanabad district ) दौऱ्यावर आले असता, आयोजित पत्रकार परिषदेत (press conference ) पत्रकारांच्या प्रश्नांना उतर देताना दादा भुसे म्हणाले की, अनिल बोंडेचे हे वैयक्तिक मत असेल, त्यांनी त्यांच काम करावं धाड मॅनेज असेल तर चांगली गोष्ट आहे. मॅनेज का होईना पण आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात जो संदेश द्यायचा आहे. तो आम्ही दिलेला आहे. उद्या प्रत्येक शेतकरी (farmer ) प्रत्येक दुकानात जाऊन यांची चौकशी करणार आहेत.  त्यामुळे आम्ही केलेलं काम हे नौटंकी आहे कि नाही हे जनता ठरवेल.

काय म्हणाले होते अनिल बोंडे

औरंगाबाद येथे दादा भुसे यांनी धाड टाकल्यानंतर अनिल बोंडे यांनी दादा भुसे यांनी टाकलेली धाड मॅनेज असून, एकाच ठिकाणी धाड टाकून काही फरक पडत नाही. कृषिमंत्री नाटक नौटंकी करतात, तसेच दक्षता अधिकारी काय करतात याकडेही मंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज आहे, अस अनिल बोंडे यांनी म्हटल होत. मात्र उस्मानाबादेत अनिल बोंडे यांच्या टीकेला दादा भुसे यांनी टोला मारत उत्तर दिले आहे.

मंत्र्यांनी कुठे टाकली होती धाड

युरिया हा खत मिळत नसल्याच्या अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी भुसे यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. कृषिमंत्री औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना, प्रशासनाला कसलीही भनक लागू न देता, ते थेट नवभारत फर्टीलायझर नावाच्या एका दुकानात तोंडाला  रुमाल बांधून शेतकरी म्हणून गेले. दुकानदारास युरियाची मागणी केली. मात्र शेतकरी बनून  गेलेल्या कृषीमंत्र्यांना दुकानदाराने युरिया देण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांनी कमी प्रमाणात मागितला तरीही दुकानदाराने युरिया दिला नसल्याचे मंत्र्यांना सांगितले. मंत्र्यांनी दुकानदारास युरिया शिल्लक असल्याचे फलकावर दाखवले. दरम्यान स्टॉक रजिस्टरची मागणी केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली.

मंत्र्यांनी दुकानात बोलावले कृषी अधीक्षकास

दरम्यान हा सर्व प्रकार घडल्यानंतर मंत्र्यांनी तत्काळ कृषी अधीक्षकाना दुकानात बोलावून घेऊन चांगलीच कानउघाडणी केली आहे. दरम्यान दुकानाच्या गोडाऊनचा पंचनामा केला असता त्यांना १३८६ पिशव्या युरियाच्या आढळल्या आहेत. युरिया आढळल्यानंतर दुकानावर कारवाई करण्याचे आदेश कृषी मंत्र्यांनी दिले आहेत. याव्यतिरिक्त राज्याच्या कृषिमंत्र्यांनी इतर दुकानदाराना देखील इशारा दिला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी