कारखान्यावर धाड टाकण्यापूर्वी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी वापरला 'हा' फंडा, गाडीवर लावण्यात आले 'असे' बोर्ड

Agriculture study tour boards were installed on the vehicle of the Income Tax Department : आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकण्यापूर्वी घेऊन आलेल्या गाडीवर कृषी अभ्यास शिबीर २४ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट असा बोर्ड लावून आले होते. या गाडीवर लागलेल्या बोर्डनुसार ३० ऑगस्ट पर्यंत हा आयकर विभागाचा अभ्यास दौरा सुरु राहणार आहे.

Agriculture study tour boards were installed on the vehicle of the Income Tax Department
धाड टाकण्यापूर्वी आयकर विभागाच्या गाडीवर होते 'हे' बोर्ड   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकण्यापूर्वी घेऊन आलेल्या गाडीवर कृषी अभ्यास शिबीर असा बोर्ड लावला होता
  • गाडीवर लागलेल्या बोर्डनुसार ३० ऑगस्ट पर्यंत हा आयकर विभागाचा
  • सत्ताधारी राष्ट्रवादीच्या भालके गटाला धक्का देत २१ पैकी २० जागा अभिजित पाटलांनी जिंकल्या होत्या

उस्मानाबाद :  उस्मानाबाद येथील धाराशिव शुगर कारखान्यावर आयकर विभागाची आज पहाटे धाड पडली आहे. आयकर विभागाच्ग्या या धाडीत अनेक कागदपत्रे तपासण्यात येत असल्याची माहिती आहे. दरम्यान, आज पहाटे पासून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांची कारवाई सुरु आहे. ही कारवाई तब्बल ४ दिवस सुरु राहणार असल्याची देखील माहिती मिळाळी आहे. धाराशिव शुगर या कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील आहेत. अभिजित पाटील यांची सध्या राज्यभर साखर सम्राट म्हणून ओळख निर्माण झाली आहे. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकण्यापूर्वी घेऊन आलेल्या गाडीवर कृषी अभ्यास शिबीर २४ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट असा बोर्ड लावून आले होते. या गाडीवर लागलेल्या बोर्डनुसार ३० ऑगस्ट पर्यंत हा आयकर विभागाचा अभ्यास दौरा सुरु राहणार आहे.

अधिक वाचा : आदिवासी भागातील प्रश्नावरुन विधानसभेत जोरदार खडाजंगी

यापूर्वी अभिजित पाटलांना ३ महिने जेलवारी झाली होती, असा आहे प्रवास?

वाळू माफिया ते साखर सम्राट असा अभिजीत पाटील यांचा थक्क करणारा प्रवास आहे, त्यांना तत्कालीन सोलापूर जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांच्या कारवाईनंतर वाळू तस्करी प्रकरणात जवळपास 3 महिने जेलवारी पण झाली होती त्यानंतर त्यांनी बाहेर आल्यावर ट्रॅक बदलला व साखर कारखानदारी सुरु केली. अभिजित पाटील यांनी सुरुवातीला उस्मानाबाद जिल्ह्यातील चोराखळी येथील साखर कारखाना घेतला.यानंतर त्यांनी तब्बल ४ कारखाने घेतले आहेत. दरम्यान, अभिजित पाटील हे कारखानदरीत यशस्वी देखील झाल्याचे पहायला मिळाले आहेत.

अधिक वाचा : अनिल परबांना झटका, मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

सत्ताधारी राष्ट्रवादीच्या भालके गटाला धक्का देत २१ पैकी २० जागा अभिजित पाटलांनी जिंकल्या होत्या

अभिजीत पाटील हे पंढरपूर येथील असून ते साखर सम्राट म्हणून गेल्या १० वर्षात ओळखले जात आहेत. पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादीच्या भालके गटाला धक्का देत २१ पैकी २० जागा जिंकल्यानंतर ते प्रकाशझोतात आले होते.विठ्ठल सहकारी व धाराशिव कारखाना चेअरमन आहेत.त्यांच्या ताब्यात ५ कारखाने आहेत त्यात विठ्ठल सहकारी साखर कारखाना, सांगोला सहकारी साखर कारखाना, नाशिक व नांदेड येथे एक, उस्मानाबाद येथे असे साखर कारखाने आहेत.

अधिक वाचा  ; मनसेची आजपासून सदस्य नोंदणी मोहीम सुरू 

५ गाड्यात जवळपास २० पेक्षा जास्त अधिकारी अभिजीत पाटील यांच्या विविध संस्थाची चौकशी करीत आहेत

कृषी अभ्यास शिबीर २४ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट असा बोर्ड लावून आयकर विभागाची गाडी धाराशिव साखर कारखाना येथे धाड टाकण्यासाठी आली आहेत. या गाडीवर लागलेल्या बोर्डनुसार ३० ऑगस्ट पर्यंत हा आयकर विभागाचा अभ्यास दौरा सुरु राहणार आहे. ५ गाड्यात जवळपास २० च्या वर अधिकारी हे अभिजीत पाटील यांच्या विविध संस्थाची चौकशी करीत आहेत यात पुणे व दिल्ली येथील काही अधिकारी यांचा समावेश आहे. जालना येथे आयकर विभागाचे अधिकारी यांनी राहुल वेड्स अंजली असे स्टिकर गाडीला लावून धाड टाकण्यासाठी आले होते आता उस्मानाबाद येथे कृषी अभ्यास शिबिराचा फंडा आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी वापरला असल्याचे दिसते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी