तेरणा साखर कारखाना चालू होऊ नये म्हणून स्थानिक नेते करतायेत प्रयत्न, नाव न घेता तेरणा बचाव समितीचा स्थानिक नेत्यांवर निशाणा

ajit khot targeted osmanabad mla and mp : उस्मानाबाद जिल्हा बँकेला कारखाना संदर्भात आगामी सात दिवस कोणताही निर्णय घेण्यास उच्च न्यायालयाने मनाई केली आहे. त्यामुळे तेरणा कारखाना पुन्हा एकदा संकटात आला असल्याचे बोलले जात आहे.  

ajit khot targeted osmanabad mla and mp
कारखाना चालू होऊ नये म्हणून स्थानिक नेते करतायेत प्रयत्न  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • “अमित देशमुख्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून साधला जातोय निशाणा”
  • अमित देशमुख यांच्या ट्वेंटीवन शुगरने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती
  • सहाव्या प्रक्रियेदरम्यान भैरवनाथ कारखाना च्या वतीने साडेपाच कोटी रुपये अनामत भरून टेंडर प्रक्रियेत भाग घेतला होता

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्हा बँकेला कारखाना संदर्भात आगामी सात दिवस कोणताही निर्णय घेण्यास उच्च न्यायालयाने मनाई केली आहे. त्यामुळे तेरणा कारखाना पुन्हा एकदा संकटात आला असल्याचे बोलले जात आहे.  उस्मानाबाद जिल्ह्यातील ढोकी येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना सहकारी भाडेतत्वावर देण्याच्या निविदा प्रक्रियेबाबत लातूर येथील काँग्रेसचे नेते अमित देशमुख यांच्या ट्वेंटीवन शुगरने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती, ही याचिका कोर्टाने निकाली काढताचं ट्वेंटीवन शुगरला डीआरटी कोर्टात जाण्यास सांगितले आहे. दरम्यान, सदर प्रकरणी तेरणा बचाव समितीने आज एक पत्रकार परिषदेत नाव न घेता जिल्ह्यातील काही स्थानिक नेत्यांवर निशाणा साधला आहे.

“अमित देशमुख्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून साधला जातोय निशाणा”

दरम्यान, ट्वेंटीवन शुगरने २० मिनिटे उशीर केला असल्याने त्यांना हा कारखाना दिला नसल्याचं बचाव समितीच्या सदस्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत तेरणा बचाव समितीचे अजित खोत यांनी भीती व्यक्त करत म्हटलं आहे की, ट्वेंटीवन शुगर आणि भैरवनाथ यांच्या वादात हा कारखाना बंद राहतो कि काय असं खोत म्हणाले. तेरणा कारखाना हा सावंत यांच्याकडे जात असल्याने जनतेमधून अशी चर्चा आहे की, इथल्या काही स्थानिक राजकीय नेत्याचं राजकीय अस्तित्व हालत असल्यासारखे वाटत आहे त्यामुळे अमित देशमुख यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून निशाणा साधण्याचे काम सुरु आहे म्हणत खोत यांनी  स्थानिक नेत्यांवर निशाणा साधला आहे. दरम्यान, कारखाना चालू होण्याच्यामध्ये जर खोडा घातला तर येत्या काळात जनता बघून घेईल असं देखील खोत म्हणाले. 

सहाव्या प्रक्रियेदरम्यान भैरवनाथ कारखाना च्या वतीने साडेपाच कोटी रुपये अनामत भरून टेंडर प्रक्रियेत भाग घेतला होता

खोत यांनी तेरणा संघर्ष समितीची भूमिका मांडली ते म्हणाले, तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्यावर तीस हजार सभासदांचे भवितव्य अवलंबून आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेने तब्बल सहा वेळा टेंडर प्रक्रिया राबवली यानंतर हा प्रश्‍न निकाली लागला असे आशादायक चित्र निर्माण झाले. सहाव्या प्रक्रियेदरम्यान भैरवनाथ कारखाना च्या वतीने साडेपाच कोटी रुपये अनामत भरून टेंडर प्रक्रियेत भाग घेतला आणि हा कारखाना सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला असतानाच ट्वेंटीवन कारखान्याच्या वतीने देखील टेंडर प्रक्रियेत नाकारल्याचा कारणावरुन न्यायालयात धाव घेतली. या कारखान्याला हाताशी धरून जिल्ह्यातील तथाकथित लोकप्रतिनिधी कारखाना बंद कसा राहील यासाठी प्रयत्नशील आहेत. या तथाकथित लोकप्रतिनिधीला संघर्ष समिती सोडणार नाही. न्यायव्यवस्थेच्या आडून तेरणा साखर कारखाना बंद ठेवण्याचा जर कोणी प्रयत्न करत असेल तर ते चुकीचं आहे आणि याला संघर्ष समिती जशास तसे उत्तर देईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी