Ajit Pawar कार्यक्रमाच्या आयोजकालाचं अजित पवारांनी मंचावर झापले

Ajit Pawar target the organizer of the program on the stage : एस. पी. शुगरचे संस्थापक असलेल्या सुरेश पाटलांच्या सुपुत्रांना शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी बापाचे सगळंच ऐकू नका असा सल्ला दिल्याने कारखान्याच्या सभासदांमध्ये तडवळा पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

Ajit Pawar target the organizer of the program on the stage
कार्यक्रमाच्या आयोजकालाचं अजित पवारांनी मंचावर झापले  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सुरेश पाटलांना अजित पवारांनी थेट मंचावरचं झापले
  • सुरेश पाटलांच्या मुलाला आमदार विक्रम काळेंचा सल्ला, म्हणाले वडिलांचे जास्त ऐकू नको
  • मीच एकमेव एकनिष्ठ पदाधिकारी असल्याचे भासविण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाटलांचे सर्वासमोर पितळ उघडे पडले

उस्मानाबाद : लाखो रुपये खर्चून कार्यक्रम घेणाऱ्या सुरेश पाटलांना अजित पवारांनी थेट मंचावरचं झापले आहे. सुरेश पाटील यांनी आज मंचावर बोलताना शिवराळ भाषेचा वापर केला होता. तर तानाजी सावंत यांच्यावर देखील सुरेश पाटील यांनी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. यावर अजित पवार यांनी थेट सुरेश पाटलांनाच झापले असल्याची दिसून आले आहे. दरम्यान, सुरेश पाटील यांनीच राष्ट्रवादी संपली असल्याचे म्हटल्यावर अजित पवारांनी म्हटले की, राष्ट्रवादीचेचं (Ncp) नेते राष्ट्रवादी संपली म्हणू लागल्यावर कसे होणार असंही पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) हे कोणालाही रोखठोकपणे बोलतात. याचाच प्रत्यय आज उस्मानाबादमध्ये (Osmanabad) आला आहे. अजित पवार यांनी थेट कार्यक्रमाच्या आयोजकांनाच झापले आहे.

अधिक वाचा ; भाजपने किरीट सोमय्या आणि नवनीत राणा यांना रोजगार मिळवून दिला

सुरेश पाटलांच्या मुलाला आमदार विक्रम काळेंचा सल्ला, म्हणाले वडिलांचे जास्त ऐकू नको

एस. पी. शुगरचे संस्थापक असलेल्या सुरेश पाटलांच्या सुपुत्रांना शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी बापाचे सगळंच ऐकू नका असा सल्ला दिल्याने कारखान्याच्या सभासदांमध्ये तडवळा पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. एस. पी शुगरच्या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी कोणीतरी एस. पी. शुगर शेतकऱ्यांना योग्य भाव देत नसल्याची चिठ्ठी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला मात्र ती चिठ्ठी आ. विक्रम काळेंच्या हातात लागली आणि त्यांनी भाषणात समीर पाटील यांना ऊस गाळा, गूळ तयार करा किंवा आणखी काही करा मात्र शेतकऱ्यांना योग्य भाव द्या,तुम्ही तरुण आहात बापाचं सगळंच ऐकू नका असा अजब सल्ला दिला मात्र त्याच सल्ल्यात आजच्या कार्यक्रमाचे मोजमाप दडले आहे, कारखाना ऊसाला भाव देत नसल्याची चर्चा या निमित्ताने कारखाना परिसरात सुरू होती.

अधिक वाचा ; मधुमेहासाठी उपयुक्त असते 'आले'....लगेच साखर येईल नियंत्रणा 

मीच एकमेव एकनिष्ठ पदाधिकारी असल्याचे भासविण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाटलांचे सर्वासमोर पितळ उघडे पडले

 उस्मानाबाद जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस संपली असल्याची मुक्ताफळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस पाटील यांनी उधळल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात जमलेल्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसह देखील प्रचंड अस्वस्थता निर्माण झाल्याने कुजबूज सुरू झाली. दरम्यान यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कधी व कुठल्या काळी पक्ष संपत नसतो. भाजपने दोन जागांच्या बळावर सुरुवात करून सत्ता मिळवली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी संपली अशा पोकळ गप्पा कोणीही मारू नये असे खडावत सुरेश पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस संपणार नाही असे सुनावत आयोजित मेळाव्यात झापले. त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा फक्त मीच एकमेव एकनिष्ठ पदाधिकारी असल्याचे भासविण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाटलांचे सर्वासमोर पितळ उघडे पडले.

अधिक वाचा ; महात्मा गांधी जयंती निमित्त मराठी संदेश पाठवून करा अभिवादन

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी