तळीरामांनो ऐकलं का ! दारू हवी असेल तर आधी घ्यावे लागतील कोरोना लसीचे दोन डोस

Alcohol will be available only if vaccinated : औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आणखी एक धक्कादायक निर्णय घेतला होता.  यापूर्वी त्यांनी लस घेतली असेल तरच पेट्रोल दिले जाण्याचा निर्णय घेईल होता.

Alcohol will be available only if vaccinated
तळीरामांनो! आधी कोरोना लसीचे दोन डोस घ्या मग दारू प्या  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • लसीचे २ डोस पूर्ण झाले असतील तरच दारू मिळणार
  • यापूर्वी लस घेतली असेल तरच पेट्रोल दिले जाण्याचा निर्णय घेईल होता
  • दुसरा डोस घ्यावा यासाठी स्वयंपाकाची भांडी, रोख रक्कम , लकी ड्रॉ देण्याचा केंद्र सरकारकडून केला विचार जातोय

Alcohol will be available only if vaccinated औरंगाबाद : कोरोना सारख्या महामारीपासून वाचण्यासाठी लसीकरण हा एक उत्तम उपाय मानला जातो. राज्यात लसीकरण मोठ्या प्रमाणात सुरु असलं तरी आणखी अनेकांनी लस घेतली नाही. लसीकरण मोठ्या प्रमाणात व्हावे यासाठी सरकार आणि प्रशासन अनेक प्रयत्न करत असल्याचं पहायला मिळत आहे. त्यातच आता मद्यप्रेमींसाठी एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. लस घेतली असेल तरच त्या मद्यप्रेमींना दारू मिळणार आहे. लसीचे २ डोस पूर्ण झाले असतील तरच दारू मिळणार आहे. दुकान विक्रेत्यांना याबाबत खात्री करण्याचे व नियमांचे पालन करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील मद्यप्रेमींसाठी ही धक्कादायक बातमी आहे.

यापूर्वी लस घेतली असेल तरच पेट्रोल दिले जाण्याचा निर्णय घेईल होता

 दरम्यान , लसीचा डोस घेतला नसेल तर दारूचा विषय सोडा असाच काहीसा हा निर्णय आहे. कारण लसीचा एकही डोस जर झाला नसेल तर त्यांना दारू विक्री करता येणार नाही. लस घेतली नसेल तर तुम्हाला औरंगाबाद शहर व जिल्ह्यात आता यापुढे दारू मिळणार नाही. औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आणखी एक धक्कादायक निर्णय घेतला होता.  यापूर्वी त्यांनी लस घेतली असेल तरच पेट्रोल दिले जाण्याचा निर्णय घेईल होता. विषय निमित्त काहीही असो कोरोना लसीकरण वाढविणे हा या मागचा उद्गात हेतू आहे हे मात्र नक्की. कोरोना लसीकरण करून स्वतः व कुटुंबाला वाचवा हा संदेश देण्यासाठी विविध क्लुप्त्या वापरल्या जात असून माझे कुटुंब , समाज माझी जबाबदारी याची जाणीव सर्वांना होणे गरजेचे आहे.

दुसरा डोस घ्यावा यासाठी स्वयंपाकाची भांडी, रोख रक्कम , लकी ड्रॉ देण्याचा केंद्र सरकारकडून केला विचार जातोय

लसीकरणाची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढविण्यासाठी केंद्र सरकारकडून आता लवकरच लकी ड्रॉ सुरू केला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. पहिला डोस अनेकांचा पूर्ण झाला असून, दुसरा डोस घ्यावा यासाठी स्वयंपाकाची भांडी, रोख रक्कम अशा पद्धतीने बक्षीस ही लकी ड्रॉ मधून देण्याचा विचार केंद्र सरकारकडून केला जात असल्याची माहिती समोर येत आहे. अनेक राज्यांमध्ये लसीकरणचा आकडा वाढलेला नाही त्यासाठी केंद्र सरकारकडून हे प्रयत्न केले जाणार आहेत.अनेक राज्यात , जिल्ह्यात आजही लसीकरण कमी आहे. 

राज्यात रोज जवळपास पाच लाख लोकांचे लसीकरण होत आहे- राजेश टोपे

या नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत किंवा त्या पुढच्या दहा दिवसांमध्ये राज्यातील १०० टक्के लोकांना लसीचा पहिला डोस मिळेल याचे नियोजन करण्यात आलं आहे. असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. राज्यातील लसीकरणावर बोलताना राजेश टोपे म्हणाले की, राज्यात रोज जवळपास पाच लाख लोकांचे लसीकरण होत आहे. मात्र, १०० टक्के लोकांना लसीचा पहिला डोस लवकर पूर्ण करण्यात येईल.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी